एक लाख वर्षांपूर्वी चप्पल घालत होता माणूस!

एक लाख वर्षांपूर्वी चप्पल घालत होता माणूस!
Published on
Updated on

केप टाऊन : पुरातत्त्व संशोधकांनी आता एका नव्या संशोधनाच्या आधारे म्हटले आहे की मध्य पाषाण युगात म्हणजे 75 हजार ते दीड लाख वर्षांपूर्वीच्या काळातील माणूसही चप्पल परिधान करीत होता. मानव प्रजातीमध्ये व्यावहारिक बुद्धिमत्तेची क्षमता अनुमानाच्या आधीपासून आहे. युरोपमधील सर्वात प्राचीन ज्ञात चप्पल हे 6 हजार वर्षांपूर्वीचे आहे. दक्षिण आफ्रिकेतील मानव पायात वहाणा दोन हजार वर्षांपूर्वी पायात वहाणा घालत नव्हते असे मानले जात होते. मात्र आता दक्षिण आफ्रिकेतीलच या शोधाने ही धारणा बदलली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या केप तटावर आढळलेल्या तीन प्राचीन पृष्ठभागांवर याबाबतचे काही जीवाश्म सापडले आहेत. विट्स इव्होल्युशनरी स्टडीज इन्स्टिट्यूटचे डॉ. बर्नहार्ड जिपफेल यांनी सांगितले की प्रागैतिहासिक काळात मानव समुद्रकिनारी चालत असताना पादत्राणे वापर असल्याचे पुरावे मिळाले आहेत. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'इच्नोस' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

डॉ. जिपफेल यांनी सांगितले की सर्वसाधारणपणे आपल्याला असे वाटते की त्या काळातील लोक अनवाणीच राहत असत. मात्र त्या काळात दक्षिण केप तटावरील खडक अतिशय तीक्ष्ण होते. त्यामुळे आपल्या पायांच्या सुरक्षेसाठी त्यावेळेचे लोक काही ना काही परिधान करीत असावेत हे स्पष्टच होते. एक लाख वर्षांपूर्वी पायाला झालेली अशी जखम जीवघेणी ठरू शकत होती. त्या काळातील माणसाच्या पायांचे ठसे याठिकाणी सापडले आहेत. मात्र या ठशांमध्ये पायाची बोटे दिसत नाहीत. त्यावरून असे दिसते की त्यांनी पायात काही तर वहाणा घातलेल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news