जन्मतःच सरड्याने बदलला रंग! | पुढारी

जन्मतःच सरड्याने बदलला रंग!

नवी दिल्ली : रंग बदलण्याची क्षमता सरड्याला निसर्गाने दिलेल्या देणगीतूनच मिळत असते. विशेषतः शॅमेलिऑन सरडे क्षणार्धात असे रंग बदलत असतात. ही देणगी त्यांना जन्मजातच असते हे दर्शवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सरडा ज्या पृष्ठभागावर उभा राहतो त्याचा रंग धारण करतो. त्यामुळे शत्रूंपासून त्याचं संरक्षण होतं. शिवाय शिकार करण्यासाठी देखील मदत मिळते. रंग बदलण्याची ही कला जन्मजातच सरड्यांना मिळते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका माणसाच्या तळहातावर अंड्यातून बाहेर येत असलेल्या शॅमेलिऑनच्या पिल्लाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

या व्हिडीओमध्ये अंड्यातून बाहेर पडणारा हा सरडा पाहू शकता. या सरड्यानं अंड्यातून बाहेर पडल्यानंतर आधी आसपासचं निरीक्षण केलं आणि मग हाताचा रंग धारण केला. अर्थात आयुष्यात पहिल्यांदाच रंग बदलत असल्यामुळे तो पूर्णपणे बदलला नाही, पण तरी देखील त्यानं जे काही केलं ते पाहून देखील तुम्ही अवाक व्हाल!

Back to top button