फळे की फळांचा ज्यूस, काय आहे अधिक लाभदायक? | पुढारी

फळे की फळांचा ज्यूस, काय आहे अधिक लाभदायक?

नवी दिल्ली : आरोग्यासाठी नियमितपणे फळे खाणे चांगले असते. डॉक्टर आणि आहार तज्ज्ञही हंगामी फळे खाण्याची शिफारस करतात. सकाळी एक ग्लास फळांचा रस पिणे हे आरोग्यसाठी फायदेकारक वाटत असले तरी, रस न पिता संपूर्ण फळांचं सेवन केल्यास अधिक फायदे मिळतात, असे देखील आपल्या घरातील मोठे आपल्याला सांगताना दिसतात. तेव्हा फळ खाणे अधिक फायदेशीर आहे की त्यांचा ज्यूस पिणं, चला जाणून घेऊया.

एक ग्लास ताज्या फळांचा रस अनेकदा सकाळची चांगली सुरुवात मानली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर ठरते. ज्यूसिंग प्रक्रिया फळांमधील फायबर काढून टाकते आणि कॅलरी कंट्रोल करते, ज्यामुळे पौष्टिक मूल्य कमी होतात. ज्यूसिंगमध्ये अनेक प्रक्रियांचा समावेश होतो ज्यामुळे फळांचे सूक्ष्म पोषक घटक काढून टाकतात, जसे की जीवनसत्त्वे अ आणि क. फळे खाल्ल्याने तुम्हाला हे आवश्यक घटक त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात मिळतात. फळे आवश्यक पोषक तत्त्वांनी भरलेली असतात. फळांच्या रसापेक्षा संपूर्ण फळांचे सेवन केल्याने अधिक लाभ मिळण्याची खात्री असते.

फायबर पाचक आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. फळांचे थेट सेवन केल्यानं फायबर टिकून राहते, परिपूर्णतेची भावना वाढते आणि पचनास मदत होते; तर रस काढल्यानं हा आवश्यक घटक काढून टाकला जातो. टेटरा पॅक किंवा ज्यूसच्या बॉटलमध्ये फळांच्या रसांमध्ये अनेकदा साखरेचा समावेश होतो, ज्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढू शकते. फळे निवडल्यानं साखरेची पातळी नियंत्रित राखण्यात मदत होते, हे विशेषत: मधुमेह असलेल्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. फळ आणि त्याचा रस सारख्याच चवी असू शकतात; परंतु संपूर्ण फळांची पौष्टिक श्रेष्ठता अतुलनीय आहे. फळाचे सेवन केल्यानं तुम्हाला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मोठ्या प्रमाणात मिळतात. फळ आणि त्याचा रस यांच्यातील पर्याय दिल्यास, तज्ज्ञ फळ निवडण्याची शिफारस करतात. डॉक्टर ज्यूसपेक्षा ताज्या फळांचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

Back to top button