मंगळाचे क्षितिज दिसू शकते हिरवे!

मंगळाचे क्षितिज दिसू शकते हिरवे!
Published on
Updated on

लंडन : मंगळ हा लाल ग्रह असला तरी त्याचे क्षितिज मात्र हिरवे दिसू शकते असे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. मंगळावरील वातावरण हिरवट रंगात चमकते. युरोपियन स्पेस एजन्सीच्या एक्झोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटरच्या सहाय्याने संशोधकांनी मंगळावरील वातावरण हिरवट रंगात चमकत असताना प्रथमच पाहिले आहे. हा रंग डोळ्यांना द़ृश्य स्वरूपात असलेल्या प्रकाशातही म्हणजेच लाईट स्पेक्ट्रममध्येही दिसतो.

या इफेक्टला 'एअरग्लो' (किंवा वेळेनुसार डेग्लो किंवा नाईटग्लो) म्हटले जाते. असा प्रकार पृथ्वीवरही आढळतो. ध्रुवीय प्रदेशात होणार्‍या 'नॉर्दन लाईटस्' किंवा ऑरोरामध्ये तो दिसतो. अर्थात ही एक वेगळी घटना आहे. सौरकण ज्यावेळी पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाला धडकतात त्यावेळी असा ऑरोरा निर्माण होत असतो. मंगळावरील प्रकार वेगळा आहे.

'नाईटग्लो' हा प्रकार विशेषतः दोन ऑक्सिजन अणू ऑक्सिजनचा एक रेणू बनवण्यासाठी एकत्र येतात त्यावेळी घडतो, असे 'युरोपियन स्पेस एजन्सी'ने म्हटले आहे. मंगळावर ही घटना पृष्ठभागापासून 50 किलोमीटर उंचीवर घडते. मंगळावर गेल्या 40 वर्षांपासून असे घडत असावे असे संशोधकांना वाटते. मात्र, 'इसा'च्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटरने इन्फ्रारेड स्पेक्ट्रममध्ये दहा वर्षांपूर्वी याचा पहिला संकेत मिळवला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news