ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांच्या घरी दिवाळी साजरी

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांच्या घरी दिवाळी साजरी

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांनी ब्रिटिश पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी दिवाळी साजरी केली. या दोघांनी दिवाळीनिमित्त '10 डाऊनिंग स्ट्रीट' या निवासस्थानी केलेली खास भारतीय पद्धतीची सजावट आणि दिवाळीमय वातावरण पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला!

दिवाळीनिमित्त दीपप्रज्वलन करून डाऊनिंग स्ट्रीटच्या निवासस्थानी या दोघांनी निमंत्रित पाहुण्यांसहीत दिवाळी साजरी केली. सुनाक आणि पत्नी अक्षता यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट करण्यात आले आहेत. या सेलिब्रेशननसाठी मोठ्या संख्येने पाहुणे '10 डाऊनिंग स्ट्रीट' येथील घरी आले होते. ऋ षी सुनाक आणि पत्नी अक्षता मूर्ती दोघांनी पाहुण्याचे आदरातिथ्य केले.

अक्षता या भारतीय पेहरावामध्ये होत्या, तर ऋषी यांनी ब्लेझर आणि फॉर्मल कपडे परिधान केले होते. 'सायंकाळी पंतप्रधान ऋ षी सुनाक यांनी हिंदू धर्मातील पाहुण्यांचं डाऊनिंग स्ट्रीटच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त स्वागत केलं. अंधःकारावर मात करून तेजोयम दिव्यांची आरास करण्याचा हा सण आहे,' असे पंतप्रधान सुनक यांच्या अधिकृत हॅण्डलवरून पोस्ट करण्यात आले आहे. '10 डाऊनिंग स्ट्रीट' येथील घराबाहेर समया प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. तसेच प्रवेशद्वारावर रांगोळीचाही थाट घातला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news