turmeric milk : एक चिमूटभर हळद दूधात मिसळून प्या अन् मोठा फायदा मिळवा… | पुढारी

turmeric milk : एक चिमूटभर हळद दूधात मिसळून प्या अन् मोठा फायदा मिळवा...

नवी दिल्ली : हळदीचे दूध turmeric milk आरोग्यासाठी चांगले असते हे तुम्ही अनेकदा वयस्कर लोकांकडून ऐकले असेल. दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. हळद ही अँटीबायोटिक म्हणून ओळखली जाते. वजन कमी करणे, जखमेवरील मलम, त्वचेसाठी हळदीचा वापर होतो. मात्र याच हळदीचे दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद turmeric milk अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते. तसेच आजार लवकर बरा होण्यासही मदत मिळते. हळद दूध रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते. विविध अभ्यासानुसार असे सांगितले आहे की, मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. तसेच कर्करोगाचा धोका कमी होतो. हळद दुधामुळे पचन करण्यास मदत होते.

हळद मिसळून जास्त प्रमाणात दूध पिल्यास त्रास होऊ शकतो. म्हणून एक चिमूटभर हळद दुधात मिसळणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. हळद दुधात एक चिमूटभर मिरपूड मिसळल्यास घसा खवखवणे आणि संसर्ग कमी होण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर गरम दूध प्यायल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते.

Back to top button