कोणत्या प्राण्यांना आरशातील आपली छबी ओळखता येते? | पुढारी

कोणत्या प्राण्यांना आरशातील आपली छबी ओळखता येते?

वॉशिंग्टन : मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे जो रोज न चुकता आपली छबी आरशात न्याहाळत असतो. मात्र, अन्य कोणत्या प्राण्यांना आरशातील आपली छबी ओळखता येते? संशोधकांना याबाबतची कुतुहल होते व त्याद़ृष्टीने 1970 च्या दशकापासूनच संशोधन सुरू झाले होते. अगदी मोजक्या प्रजातीच्या प्राण्यांना आरशात दिसणारी छबी आपलीच आहे हे समजते, असे त्यामधून दिसून आले.

संशोधकांनी हा प्रयोग चिम्पांझीपासून सुरू केला होता व त्याची माहिती 1970 मध्ये प्रसिद्ध झाली होती. नंतर अन्यही अनेक जीवांबाबत असा अभ्यास झाला. त्यामध्ये मुंग्यांपासून मांटा रे पर्यंत आणि आफ्रिकन ग्रे पॅरोटस्पर्यंत अनेक जीवांचा याद़ृष्टीने अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये काही मोजकेच जीव आरशात आपलीच छबी आहे हे समजू शकतात असे दिसून आले. इमोरी युनिव्हर्सिटीतील प्रायमॅटोलॉजिस्ट फ्रान्स डी वाल यांनी सांगितले की या परीक्षेत अनेक प्राणी अनुत्तीर्ण झाले. अगदी कॅपुचिन माकडेही नापास झाली! चिम्पांझी मात्र या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते.

1970 मध्ये चार चिम्पांझींच्या चेहर्‍यावर काही खुणा करून त्यांना आरसा दाखवला होता. आरसा पाहून त्यांनी आपल्या चेहर्‍यावरील खुणांवर नेमकेपणाने बोट ठेवून तपासणी केली. ओरांगऊटान, बोनोबोसारख्या अन्य एप्सनाही आरशातील आपली छबी कळते असे दिसून आले. ब—ाँक्स प्राणीसंग्रहालयात आशियाई हत्तींबाबत हा प्रयोग केल्यावर तेही आपली छबी ओळखतात असे दिसून आले. डाल्फिनमध्येही ही क्षमता असते. काही प्रजातीची कबुतरेही त्याबाबत ‘हुशार’ निघाली! वाईल्ड अडेली पेंग्विनमध्येही ही क्षमता असते.

संबंधित बातम्या
Back to top button