सफाई करताना सापडले लॉटरी तिकीट आणि… | पुढारी

सफाई करताना सापडले लॉटरी तिकीट आणि...

वॉशिंग्टन : कुणाचे नशीब कधी व कसे उघडेल हे काही सांगता येत नाही. तसेच नशिबात असेल तर ते कसेही मिळतेच असे म्हटले जाते त्याचीही अनेक वेळा प्रचिती येत असते. असाच एक प्रकार अमेरिकेतील माणसाबाबत घडला आहे. या माणसाने काही महिन्यांपूर्वी 15 दशलक्ष डॉलर्सचे मनी मेकर स्क्रॅच लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्यानंतर तो या तिकिटाची आठवण ठेवणेही विसरला.

अखेर घराची साफसफाई करीत असताना त्याला अचानक हे तिकीट सापडले आणि या तिकिटाला चक्क 10 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 कोटी 30 लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचे त्याला समजले! मॅसाच्युसेटस्मधील रहिवासी असलेल्या खलील सूसा याच्याबाबत हा प्रकार घडला.

त्याच्या घरातील फुलदाणीमध्ये हे लॉटरी तिकीट होते. ते स्क्रॅच केल्यावर त्याला हे बक्षीस लागल्याचे दिसून आले. त्याने यासाठी एकरकमी रोख पेमेंटचा मार्ग स्वीकारला. त्यामधून त्याला 6,50,000 डॉलर्स मिळाले. आर्थिक संकटात असलेल्या आपल्या एका मित्राला यामधील काही रक्कम मदत म्हणून देण्याची आपली इच्छा असल्याचे त्याने सांगितले. अन्यही काही गरजू लोकांना यामधील पैसे आपण देणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. दान करण्यासाठीच्या आपल्या काही योजना असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या
Back to top button