पृथ्वीचा कोअर होत आहे ‘लीक’! | पुढारी

पृथ्वीचा कोअर होत आहे ‘लीक’!

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी कॅनडाच्या बाफिन बेटावरील ज्वालामुखीय खडकांमध्ये हेलियमचे एक दुर्मीळ व्हेरिएंट ‘हेलियम-3’चे आश्चर्यकारक प्रमाण असल्याचे शोधले आहे. त्यामधून या सिद्धांताला पुष्टी मिळाली आहे की नोबेल गॅसची (अक्रिय गॅस) पृथ्वीच्या कोअरमधून गळती होऊ लागली आहे. हे काही शतकांपासून नव्हे तर हजारो वर्षांपासून होत आहे.

संशोधकांच्या एका पथकाने खडकांमध्ये ‘हेलियम-4’ चा सुद्धा छडा लावला आहे. ‘हेलियम-4’ हे पृथ्वीवर सर्वसामान्यपणे आढळत असतेच. मात्र, हेलियम-3 हे ब्रह्मांडात अन्यत्र अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे बाफिन बेटावरील खडकांमध्ये त्याचे मोठे प्रमाणात संशोधकांना चकीत करणारेच होते.

याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. वुडस् होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशनमधील भूविज्ञान आणि भूभौतिक विभागातील सहायक वैज्ञानिक फॉरेस्ट हॉर्टन यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की सर्वात मूलभूत स्तरावर ब्रह्मांडात ‘4 एचई’ (हेलियम-4)च्या तुलनेत 3 एचई (हेलियम-3) अधिक प्रमाणात आहे. मात्र, ते पृथ्वीवर दुर्मीळ आहे.

पृथ्वीचा खडकाळ भाग चुलीवर ठेवलेल्या उष्ण पाण्याप्रमाणे हलत असतो. कोअरमधून अशी सामग्रीही वर येते, थंड होते आणि गायब होते. थंड होण्याच्या प्रक्रियेत हेलियम वातावरणात आणि नंतर अंतराळात गायब होत असतो. आता पृथ्वीच्या कोअरमधून लीक होत असलेल्या घटकांचा छडा लागल्याने आपला ग्रह काळाच्या ओघात कसा बनला व विकसित झाला हे जाणून घेण्यास मदत होऊ शकते.

Back to top button