

नवी दिल्ली : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने शरद ऋतूतील ऋतुमानातील उपयुक्त आहाराची माहिती दिली आहे. हिवाळ्यातील आहारात पडवळ, दुधी, कारले, रताळ, मुळा, गाजर, बीटरूट आणि कोहाळ्याचा समावेश करण्यास सांगितले आहे. पडवळमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॉपर, डायटरी फायबर, खूप कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे पचन सुधारते. मेंदूची क्षमता आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे खावे.
पाण्याने भरलेले दुधी भोपळा बद्धकोष्ठतेपासून आराम देते. पडवळ प्रमाणे, हे देखील कमी कॅलरी आहे, जे वजन कमी करण्यासाठी खाल्ले जाऊ शकते. हे यकृत निरोगी बनवते आणि उच्च रक्तदाब कमी करते. कारले हे मधुमेहविरोधी अन्न आहे आणि हृदयासाठी फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्त शुद्ध होते. हे पोट, त्वचा, केस आणि द़ृष्टी सुधारते. रताळे आणि मुळा या दोन्ही हिवाळ्यातील भाज्या आहेत. यामध्ये अनेक मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंटस् असतात.
रताळे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 5, मँगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट प्रदान करते, तर मुळ्याच्या सेवनाने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पचन विकार, बुरशीजन्य संसर्ग यापासून आराम मिळतो. गाजर खाल्ल्याने द़ृष्टी तीक्ष्ण होते आणि रोग प्रतिकारशक्ती आणि मेंदू वाढतो. बीटरूट फोलेट आणि सेल फंक्शन वाढवण्यास मदत करते. स्नायू, हृदय आणि मेंदूला पुरेसे ऑक्सिजनयुक्त रक्त प्रदान करते.