सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात मॅनली सी क्रिएचर सँ कच्युअरी आहे. अर्थात ती 2018 मध्येच बंद पडली आहे. एकवेळ असाही होता, ज्यावेळी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असायची. यात असलेले पाण्यातील बोगदा, हे त्याचे ठळक वैशिष्ट्य होते. याच अभयारण्यात एक अॅक्वॅरियम देखील होते. यात कित्येक वर्षे कोणीच आत गेले नव्हते. पण, एक व्यक्ती इथे आत घुसली आणि त्याने तेथे वाचलेला संदेश निव्वळ थक्क करणारा होता.
तसे पाहता, जगभरात असे अनेक लोक असतात, ज्यांना अति प्राचीन, अवशेष राहिलेल्या ठिकाणी जाणे अधिक आवडत असते. अनेकदा काही शहरांना देखील असे भकास स्वरूप लाभते. वर्षांनुवर्षे बंद पडलेले दुकान, घर, इमारत पाहणे पाहणे ज्यांना आवडते, त्यांना अर्बन एक्सप्लोअरर असे म्हणतात. असाच एक अर्बन एक्सप्लोअरर चर्चेत आला असून त्याने समुद्री जीवासाठी तयार केल्या गेलेल्या एका अभयारण्यात घुसत तेथील अॅक्वॅरियमकडे धाव घेतली होती.
या अभयारण्यातील बोगद्यात 40 लाख लिटर पाणी साठ्याची क्षमता होती आणि ते उभारण्याकरिता 90 कोटींहून अधिक खर्च आला होता. पण, यानंतरही त्याची पुरेशी देखभाल केली गेली नाही आणि यामुळे ही पूर्ण जागाच बंद करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर, एका अर्बन एक्सप्लोअररचे लक्ष त्याकडे गेले आणि त्याने आत घुसखोरी केली. तो आत गेला, त्यावेळी त्याला खराब दरवाजे दिसले, गढूळ पाणी साचलेले दिसले. अभयारण्य बंद केले जात असताना शेवटच्या दिवशी तिथे एक फलक लावला होता. त्या फलकावर म्हटले होतेे. आज आमचा शेवटचा दिवस आहे. आम्हाला मागील 55 वर्षांपासून पाठबळ दिल्याबद्दल सर्वांचे आभार!
अर्थात, याचा व्हिडीओ व काही छायाचित्रे बाहेर आल्यानंतर अनेक युझर्सनी आत घुसखोरी करणार्या त्या अर्बन एक्सप्लोअररचे बरेच ट्रोलिंग केले. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स वाहतूक खात्याने देखील लोकांची सुरक्षितता लक्षात घेता आत कोणीही प्रवेश न करणेच योग्य आहे, असे जाहीर केले. त्यानंतर आता तिथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून यापुढे तेथे आणखी कोणीही जाणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.