खेड्यापेक्षाही छोटा, 297 लोकांचा देश! | पुढारी

खेड्यापेक्षाही छोटा, 297 लोकांचा देश!

सेबोर्गो : जगभरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्याची आपल्याला कल्पना देखील असत नाही. जगातील छोट्या देशांमध्ये सॅन मॅरिनो व व्हॅटिकन सिटीचा आवर्जून समावेश होतो. मात्र, एक देश असाही आहे, जो केवळ 14 किलोमीटर अंतरापुरताच मर्यादित आहे आणि त्या देशाची लोकसंख्या जेमतेम 297 इतकीच आहे! या छोट्याशा देशाचे नाव सेबार्गो असे असून त्याच्या क्षेत्रफळात एखादे छोटे गावदेखील वसू शकणार नाही!

आता 1 हजार वर्षांपूर्वी सेबार्गोला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा लाभला. आता हा देश छोटा आहे म्हणून तेथे जाण्यासाठी पासपोर्ट लागत नाही, असेही नाही. या देशातही जाण्यासाठी त्यांचे नियम, त्यांची संहिता पाळावी लागते. पासपोर्ट, व्हिसासारख्या औपचारिकता साहजिकच पूर्ण कराव्या लागतात.

या छोट्या देशाला 1 हजार वर्षांपूर्वी स्वातंत्र्य लाभले आणि पोपनी त्याच्या मालकाला राजा म्हणून घोषित केले. 1719 मध्ये चक्क या देशाचीच विक्री झाली; पण मायक्रोनेशनचा दर्जा कायम राहिला. 1800 मध्ये इटलीचे एकीकरण झाले, त्यावेळी सर्वांना या देशाचा विसर पडला. 1960 मध्ये देशाचा राज्याचा दर्जा कायम आहे, याची जाणीव होताच येथील एका नागरिकाने स्वत:लाच देशाचा राजा घोषित केले आणि पुढील 40 वर्षांत देशाचा स्वतंत्र कायदा, चलन, स्टॅम्प व राष्ट्रीय सुट्टीही तयार केली. त्यावेळी 320 लोकांच्या देशाचा मार्सेलो हा राजा झाला.

सध्या सेबार्गोची मालकी राजकुमारी नीना हिच्याकडे आहे. 2019 मध्ये तिला निवडण्यात आले होते. सर्जिओ लुगिनो हे या देशाचे चलन आहे. आताही विदेशी पर्यटक येथे फक्त हा देश आहे कसा, ते पाहण्यासाठी येत राहतात आणि लोकांना येथे आल्यावर टाईम ट्रॅव्हेलची अनुभूती येते, असे सांगितले जाते. सध्या या देशाची लोकसंख्या जेमतेम 297 इतकी आहे.

Back to top button