थंड तेलातील अतिकापराचे प्रमाण धोक्याचे; ‘या’ आराेग्‍याच्या समस्‍या निर्माण होऊ शकतात | पुढारी

थंड तेलातील अतिकापराचे प्रमाण धोक्याचे; 'या' आराेग्‍याच्या समस्‍या निर्माण होऊ शकतात

वाराणसी : डोकेदुखी, थकवा आणि निद्रानाश दूर करण्यासाठी आपण थंड तेलाचा वापर करत असाल तर त्यातील कापराचे प्रमाण धोकादायक असेल का, याची खात्री करून घेणे तितकेच आवश्यक असणार आहे. हे तेल डोक्यातील नस अधिक कमकुवत करू शकते. अशा तेलातील कापराचे प्रमाण अधिक असेल तर डोकेदुखी, ब्रेन हॅमरेज, ब्रेन स्ट्रोक, डोळ्याची कार्यक्षमता कमी होण्याची भीती अशा समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

बीएचयूमधील न्यूरॉलॉजी विभागात प्रत्येक महिन्याला असे 50 पेक्षा रुग्ण येत आहेत आणि त्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. सध्या थंड तेलाचे ब्रॅँडिंग सेलिब्रिटीकडूनही करवले जाते. मात्र, त्याचे दुष्परिणाम अतिशय धोकादायक असतात. प्रा. व्ही. एन. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलात कापराची मात्रा 11 एमईक्यू मि.लि. इक्विलेंट-लिटर इतकी असणे आवश्यक आहे; पण सध्या कापराचा वापर त्यापेक्षा अधिक केला जात आहे. काही कंपन्या तर चक्क 20 ते 25 एमईक्यू कापराचा यात वापर करतात, असे निदर्शनास आले आहे.

Back to top button