न्यूमोनियापासून बचावासाठी उपयुक्त ठरणार हिमोफिलस लस | पुढारी

न्यूमोनियापासून बचावासाठी उपयुक्त ठरणार हिमोफिलस लस

सोलन : देशातील मुलांना बी-टाईप न्यूमोनिया व सेप्टिक गाठीसारख्या धोकादायक संक्रमणापासून वाचवण्यासाठी आधुनिक लस तयार केली गेली आहे. सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीने या लसीच्या तिसर्‍या बॅचला रीतसर मान्यता दिली आहे. ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असे संकेत आहेत. जागतिक स्वास्थ संघटनेने तीन स्तरांत चाचणी केल्यानंतर या लसीला हिरवा कंदील दर्शवला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आजवर या आजारापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी हिब लस दिली जात असे. आता या लसीला आधुनिक रूपात तयार केले गेले असून, त्याला हिमोफिलस असे नाव देण्यात आले आहे. ही लस सांधे आणि हाडांवरील गंभीर आजारापासून बचावासाठीदेखील अतिशय महत्त्वाचे ठरू शकतात. ही लस एक वर्षाच्या मुलांना टोचली जाते. भविष्यात संसर्ग झाला तर तो धोकादायक नसेल, यासाठी प्रतिबंधक म्हणून ही लस विशेष गुणकारी ठरेल, असा दावा यात केला गेला आहे.

सध्या देशात तयार होणार्‍या प्रत्येक लसीचे परीक्षण सीडीएल कसौलीत होते आणि त्यानंतरच ती लस बाजारात उपलब्ध करून दिली जाते. काही दिवसांपूर्वी हिमोफिलस लसीच्या तिसर्‍या बॅचला मान्यता दिली गेली. यापूर्वीदेखील आजारावर प्रतिबंधक लसीची या प्रयोगशाळेत चाचणी झाली आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्या. कोरोना कालावधीतदेखील या प्रयोगशाळा कर्मचार्‍यांनी झटपट प्रक्रिया साकारत त्या लसीचे सोपस्कार पूर्ण केले होते.

Back to top button