घरातही असतो रेडिएशनचा धोका!

घरातही असतो रेडिएशनचा धोका!

सॅन फ्रॅन्सिस्को : एरवी आपण घरी असतो, त्यावेळी स्वत:ला बरेच सुरक्षित मानत असतो. पण, आपल्या घरातही असे अनेक गॅजेटस् असतात, ज्यातून धोकादायक रेडिएशन बाहेर पडत असते आणि आपल्या प्रकृतीसाठी ही बाब खूपच धोकादायक असते. यावर काही उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे.

घरातील टीव्ही, संगणकाचा मॉनिटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल आणि काही विशिष्ट घड्याळे यातून विकिरण उत्सर्जित होत असतात. इंटरनेटचा सिग्नल वाढवण्यासाठी वापरात येणारे राऊटर देखील याचा एक अविभाज्य घटक ठरत आले आहे. यातून रेडॉनसारखे किरणे निघतात. ती ही धोकादायक असतात.

नवजात अर्भके, लहान मुले, ज्येष्ठ व्यक्ती, गर्भवती महिला आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असणारे लोक यांना याचा अधिक धोका संभवतो. विकिरणामुळे कर्करोगासारखे जीवघेणे विकाराचा धोका वाढतो. रेडॉन याशिवाय फुफ्फुसाला देखील नुकसान पोहोचवू शकतात. हा धोका कमी करण्यासाठी काही उपाय करता येण्यासारखे आहेत. यामध्ये घरी लावले गेलेले वाय-फाय राऊटरची सिग्नल स्ट्रेंथ कमी ठेवणे हा महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. कोणतीही गॅजेटस् गरज नसताना ऑन करून ठेवू नयेत आणि आवश्यकतेशिवाय त्याचा वापर करू नये. कोणतेही गॅजेट बेडरूममध्ये ठेवू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईलची आवश्यकता नसेल, तर तो आपल्यापासून शक्य तितका दूर राहील, याची दक्षता घ्यावी. फोनवरील बोलणे जास्त असेल, तर अशा वेळी फोन स्पीकर मोडवर ठेवावा किंवा हेडफोन वापरणे अधिक रास्त ठरते. याशिवाय, रेडिएशन कमी करण्यासाठी इनडोअर प्लँटही लावणे, याची तीव्रता कमी करू शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news