रायपूर, वृत्तसंस्था : येथील एका 27 वर्षांच्या तरुणाच्या पोटात गर्भाशय सापडल्याने डॉक्टरही अचंबित झाले आहेत. जगभरात आतापर्यंत केवळ अशा प्रकारची 300 प्रकरणे समोर आली असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात येत आहे. तरुणाची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर रोशन उपाध्याय यांनी सांगितले की, कांकेर येथील एका तरुणाच्या पोटात अनेक दिवसांपासून वेदना होत होत्या. त्याची डावी जांघही सुजली होती. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी उपचार करण्यासाठी धमतरी रुग्णालयात दाखल केले. तरुणाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले.
त्याच्यावर दुर्मीळ शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. त्याची प्रकृती सध्या ठणठणीत आहे. तरुणावर उपचार करत असताना त्याच्या पोटात गर्भाशय असल्याचे दिसून आले.