

अलास्का : अमेरिकेतील एका मच्छीमाराने एक अद्भूत मासा पकडला आहे. एरव्ही, या माशाच्या शरीरावर नारंगी व चमकते निळ्या रंगाचे पट्टे असतात. हा मच्छीमार देखील ते पाहता आश्चर्यचकीत झाला. हा मासा कापल्यानंतर तो आतूनही निळसर होता, हे आणखी आश्चर्याचे होते.
अमेरिकन राज्य अलास्काच्या होमर सिटीत चमेलेक या मच्छीमाराने हा मासा पकडला. चमेलेककडे ओटर कोव मे लॉजची मालकी आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रे फिन्डची माशाची ही एक प्रजाती असून त्याला रॉक ग्रीनलिंग्स या नावाने ओळखले जाते. मात्र, सर्वात आश्चर्याची बाब अशी की, हा निळ्या रंगाचा मासा शिजवल्यानंतर मात्र सफेद होतो. चमेलेकनी या माशाची अशी छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट केली आहेत. शिवाय, तो कसा शिजवावा, याबद्दलही मार्गदर्शन केले.
वन्यजीव एजन्सीनुसार, रॉक ग्रीनलिंग्सचे तोंड आणि मांस निळ्या अथवा निळ्या-हिरव्या रंगाचे असते. आता या माशाचे मांस निळसर चमकते कसे आहे, याचा उलगडा तज्ज्ञांनाही करता आलेला नाही. मात्र, जैविक रूपाने बिलिवेस्डीन तयार करत असल्याने त्यांना निळसर रंग प्राप्त होतो, असे सांगितले जाते. कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फिश अँड वाईल्डलाईफनुसार रॉक ग्रीनलिंग्स समुद्री किडे, क्रस्टेशियन्स व छोटे मासे खातात.