शोधूनही सापडणार नाहीत, असे इतिहासजमा देश!

शोधूनही सापडणार नाहीत, असे इतिहासजमा देश!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : आतापर्यंत दोन महायुद्धे झाली आहेत. रशिया व युक्रेन यांच्यातील प्रदीर्घ चालत आलेल्या युद्धाने अनेक आठवणी ताज्या केल्या. पण, युद्धाने कोणत्याही देशाचे भले होत नाही, हे वेळोवेळी दिसून आले आहे. काही देश तर असे आहेत, ज्यांनी युद्धामुळे आपले अस्तित्वच गमावले. वास्तविक, या देशांचे जागतिक पटलावर उत्तम स्थान होते. पण, युद्धाची खुमखुमीच अशा देशांना नडली आणि त्यांना आपले अस्तित्वच गमवावे लागले. आज अशी परिस्थिती आहे की, हे देश जागतिक नकाशात शोधूनही सापडत नाहीत. हे देश कधी काळी अस्तित्वात होते. पण, आता ते केवळ इतिहासाच्या पुस्तकापुरतेच मर्यादित राहिले आहेत.

कधी काळी अस्तित्वात असणारे असे सात देश आता पुरते इतिहासजमा झाले आहेत. प्रुशिया, रिपब्लिक ऑफ टेक्सास, युगोस्लाव्हिया, वर्मान्ट, चेकोस्लाव्हिया, किंगडम ऑफ हवाई आणि ग्रान कोलंबिया अशी या देशांची नावे आहेत. या देशांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले असून, या देशातील नागरिक आता अन्य देशांचे नागरिक म्हणून ओळखले जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news