वय वाढण्याचा वेग कमी करण्यावर संशोधकांचे लक्ष | पुढारी

वय वाढण्याचा वेग कमी करण्यावर संशोधकांचे लक्ष

वॉशिंग्टन : आपण चिरकाल तरुण राहावे, दीर्घायुष्यी व्हावे ही माणसाची इच्छा आदिम काळापासूनच आहे. मुलाचे तारुण्य घेऊन दीर्घायुष्य भोगणार्‍या व नंतर ऐहिक जीवनाला कंटाळलेल्या ययाती राजाची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. आधुनिक काळातही दीर्घायुष्यी होण्यासाठी, तारुण्य टिकवून ठेवण्यासाठीचे वेगवेगळे संशोधन होत असते. वय वाढण्याची क्रिया धीमी करण्याबाबत आता संशोधकांनी लक्ष पुरवले आहे. (Ageing Process) त्यासाठी संशोधन करणार्‍या कंपनीत मोठी गुंतवणूकही होत आहे. पेपालचे सहसंस्थापक पीटर थिएल, गुगलचे लॅरी पेज व सर्गेई बि-न आणि जेफ बेजोस यांनी आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करणार्‍या अशा कंपनीत गुंतवणूक केली आहे.

Ageing Process :  रेट्रो बायोसायन्सेसमध्ये 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक

ओपन एआयचे प्रमुख सॅम ऑल्टमॅन यांनी रेट्रो बायोसायन्सेसमध्ये 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सुद़ृढ व्यक्तीचे वय 10 वर्षे वाढवण्याचे त्यांचे ध्येय आहे. टेक रॉयल्टीद्वारा समर्थित फर्म्सच्या मार्गदर्शनात स्टार्टअप्सचा समूह अशा औषधांवर काम करत आहे, जे माणसाचे वय वाढण्याचे काही कारके मंद करण्यासह त्यांना रोखू शकतात. स्पेनची ओव्हिएडो विद्यापीठाचे कार्लोस लोपेज-ओटिन व त्यांच्या सहकार्‍यांनी वय वाढवण्याच्या 12 लक्षणांची यादी तयार केली आहे. या सर्व गोष्टी वाढत्या वयासोबतच खराब होतात व वय वाढण्याचा वेग वाढवतात. उपचारांनी त्याला धीमे करता येते. जीन्स म्हणजेच जनुकेही या वाढत्या वयाचा वेग कमी करण्यात सहाय्यभूत ठरतात.

हार्वर्ड विद्यापीठाचे जॉर्ज चर्च (बायोटेक गुरू) सांगतात, वय वाढण्याचे तपशील स्पष्ट होत असल्याने अपेक्षा आहे. लहान लहान गटात समस्येचे वर्गीकरण करण्यात संशोधक सक्षम झाले आहेत, ज्यांच्याशी वैयक्तिकरीत्या तोंड देता येईल. ‘नेचर एजिंग’ संशोधनातही या विचारांना समर्थन देण्यात आले आहे. कॅलरी इनटेक घटवूनही वय वाढण्याची प्रक्रिया धीमी करता येऊ शकते. कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांच्या गटाने 21-25 वर्षांच्या 200 तरुणांना दोन गटात विभागले. दोन वर्षांच्या संशोधनात एका गटाला 25 टक्के कमी कॅलरी देण्यात आली. दुसर्‍या गटाला सामान्य भोजन देण्यात आले. याचे निकाल हैराण करणारे होते. कमी कॅलरी घेणार्‍यांची तब्येत चांगली होती. नियमितपणे खाणार्‍यांच्या तुलनेत या लोकांमध्ये कोलेस्टेरॉल, बीपी व शुगरचे मार्कर चांगले दिसले, तर सामान्य भोजन घेणार्‍यांमध्ये ते वाढले होते.

Back to top button