Baahubali girl : अमेरिकेत जन्मली खलीसारखी बाहुबली कन्या! | पुढारी

Baahubali girl : अमेरिकेत जन्मली खलीसारखी बाहुबली कन्या!

न्यूयॉर्क : सर्वसाधारणपणे मुले जन्मतात, त्यावेळी ते बरेच नाजूक असतात. नवजात अपत्यांचे वजन जवळपास तीन किलोच्या आसपास असते. पण, अमेरिकेत अशा एका कन्यारत्नाचा जन्म झाला आहे, जी द ग्रेट खलीप्रमाणे बाहुबलीसारखी दिसून येते. जन्माच्या वेळी तिचे वजन 12 पौंड अर्थात 5.44 किलो इतके होते. या कन्येची आई तिला ‘बेबी हल्क’ या नावाने हाक देते. पण, वस्तुस्थिती हैराण करणारी आहे. ही कन्या अतिशय विभिन्न स्थितीत जन्मली असून तिची छाती व हात जन्मत:च खूप मांसल आणि मजबूत असल्याचे दिसून आले आहे.

अरमानी मिल्बी या नावाची ही कन्या अमेरिकेतील केंटुकी येथील आहे. अरमानीची आई चेल्सी यांनी सांगितले की, 17 आठवड्यांची गर्भवती असतानाच आपली कन्या एका दुर्मीळ आजाराशी झुंजत असल्याची कल्पना दिली गेली होती. या आजाराला ‘लिम्फैगियोमा’ असे म्हटले जाते. जन्मावेळी अरमानीचे वजन सर्वसाधारण वजनापेक्षा बरेच अधिक होते. 33 व्या आठवड्यात तातडीची शस्त्रक्रिया करत अरमानीला पोटातून बाहेर काढण्यात आले. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लिम्फैगियोमा या आजारात मुलांना श्वास घेणे कठीण असते. शिवाय, आणखी बरीच गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

Back to top button