हवेत गायब झाले अब्जावधींचे जेट! | पुढारी

हवेत गायब झाले अब्जावधींचे जेट!

वॉशिंग्टन : जगभरातील प्रत्येक देश आपल्या संरक्षण खात्यावर अब्जावधी रुपये खर्च करतो. शत्रूपासून बचाव हा एकच उद्देश यामागे असतो. यासाठी अनेक पद्धतींची अस्त्रे, संरक्षक वाहने तयार केली जातात, काही आयात केली जातात. मात्र यातील असेच एखादे महागडे जेट विना पायलट हवेतच गायब झाले तर ते चमत्काराशिवाय वेगळे नसेल. पण असेच काहीसे अमेरिकेत झाले असून, त्यांचे एक लष्करी जेट पायलटशिवायच हवेत गायब झाले आहे. अमेरिकेत सध्या या जेटचा शोध घेतला जात असून, प्रशासनाने यासाठी नागरिकांची मदतही मागितली आहे.

अमेरिकन हवाई दलातील हे जेट विमान विना पायलट हवेत घिरट्या घेत आहे. हवाई दल त्या विमानाच्या शोधात आहे; पण अद्याप त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. अमेरिकन हवाई दलाचे महागडे एफ-35 हे फायटर जेट गायब झाल्याने अर्थातच खळबळ उडाली आहे. या जेटचा पायलट इजेक्ट झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर या विमानाचा काहीही ठावठिकाणा सापडलेला नाही.

या विमानाचे एक वैशिष्ट्य असे आहे की, त्याचा पायलट इजेक्ट झाल्यानंतरही ते ऑटो मोडवर प्रवास करू शकते. आतापर्यंत या जेटने बरेच अंतर सहजपणे कापले आहे आणि त्याचा काहीच सुगावा लागत नसल्याने ही अमेरिकन हवाई दलाची मुख्य चिंता ठरली आहे. या जेटच्या शोधासाठी बरीच पथके तैनात केली गेली आहेत. शिवाय आसपासच्या नागरिकांनादेखील जेटशी संबंधित काही माहिती मिळाल्यास ती हवाई दलाला कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
Back to top button