चोर दिसला नाही, तरी 5 लाख रोपांची चोरी!

चोर दिसला नाही, तरी 5 लाख रोपांची चोरी!

लिसमोर : ऑस्ट्रेलियातील लिसमोर क्षेत्रात स्थित ईस्टर्न फॉरेस्ट नर्सरीत मागील कित्येक महिन्यांपासून रोपांची चोरी होत होती. सीसीटीव्ही तैनात होता. पण, चोर बाहेरून येत असताना किंवा बाहेर जात असताना देखील निदर्शनास येत नव्हता. सातत्याने चोरीचे प्रकार होतच असल्याने व्यवस्थापनही हैराण झाले होते.

हे बाहेरील चोराचे दुष्कृत्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्मचार्‍यांवर कटाक्ष ठेवण्यात आला.पण, तेथे देखील काहीही आढळून आले नाही. यानंतर मात्र सारेच चक्रावले. त्यानंतर थेट तेथेच दबा धरून बसण्याचे ठरवले गेले आणि त्यातून जी वस्तुस्थिती बाहेर आली, ती निव्वळ थक्क करणारी आहे. कारण, चोर आणखी कोणीही नव्हता तर ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा कोआला हा प्राणी या सर्वाला जबाबदार होता.

कोआला या नर्सरीतील रोपे फस्त करत असे. मागील कित्येक महिने या कोआलाने लाखो रोपांचा फडशा पाडला होता आणि कोणाला याची पत्ताही लागला नव्हता. डब्ल्यूडब्ल्यूएफ ऑस्ट्रेलियाने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर चोरीची ही घटना शेअर केली आहे. या सिक्रेट चोराने यादरम्यान पाच लाख रोपे घशात घातली. एकदा खाता खाता कोआलाची हालचाल अचानक मंदावली. तो आहे त्या जागेवरून हलू शकला नाही आणि यामुळे त्याची चोरी उघडकीस आली. सोशल मीडियावर हा चोरीचा किस्सा, त्याचा व्हिडीओ आला, त्यावेळी सर्वांनी डोक्याला हात लावणे बाकी होते. आता नर्सरीने देखील याची गांभीर्याने दखल घेतली असून यापुढे आणखी असे प्रकार होऊ नयेत, यासाठी काही फेरबदल केले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news