दिल्लीतील दुकानात मिळते ‘एवोकॅडो पान’!

दिल्लीतील दुकानात मिळते ‘एवोकॅडो पान’!
Published on
Updated on

दिल्ली : 'एवोकॅडो पान' विकणार्‍या एका छोट्याशा दुकानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही पोस्ट केली गेल्यानंतर असा फ्यूजन आयटम तयार करण्याची गरज काय होती, असा प्रश्न काहींनी विचारला. यामू पंचायतीच्या सीईओ अनिता लालवानी सुराना यांनी ही पोस्ट शेअर केली. या पोस्टनुसार, सदर पान दुकानात एवोकॅडोसह अनेक प्रकारचे पान मिळतात, याचा उल्लेख आहे.

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, हे खास पान दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये स्थित यमू पंचायत आऊटलेटमध्ये उपलब्ध आहे. व्हीडिओच्या प्रारंभी एवोकॅडो घेतो आणि पान तयार करण्याची प्रक्रिया सुरु करतो. जसजसा हा व्हिडीओ पुढे सरकत राहतो, तसतसे छोटे एवोकॅडो स्कूप काढून तो पानात ठेवल्याचे दाखवले गेले आहे. तयार झाल्यानंतर पान खाण्यायोग्य अर्धे कापलेले एवोकॅडो सजावटीसाठी वापरले जातात.

हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून आतापर्यंत त्याला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि ही संख्या वाढतच चालली आहे. आता या व्हिडीओवर काहींनी प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले तर काहींनी या अभिनव प्रयोगाची प्रशंसाही केली. एक इन्स्टाग्राम युझर म्हणाला, एवोकॅडो असा ठेवला, जसा तो काही टोमॅटो असेल. दुसरा युझर गमतीने म्हणाला, 'थोडे चीज, मेयो व अमूल बटरही घालायला हवे होते'. तिसर्‍या युझरने मात्र थेट वर्मावर घाव घातला. तो म्हणाला, 'पानात एवोकॅडो घालण्याची इतकी काय गरज भासली होती?'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news