धड जागेवर नसलेला सुरक्षारक्षक!

धड जागेवर नसलेला सुरक्षारक्षक!
Published on
Updated on

नवी दिल्ली : ऑप्टिकल इल्यूजन कोणालाही अगदी सहजपणे भ-मित करू शकतो आणि इंटरनेटवर याची काहीही कमी नाही. आता सुरक्षारक्षकाचे एक असेच छायाचित्र सर्वांना अधिक गोंधळात टाकेल. कारण, यात खुर्चीवर बसलेल्या या सुरक्षारक्षकाचे धडच जागेवर दिसत नव्हते.

एका सोशल वेबसाईटवर शेअर केल्या गेलेल्या या छायाचित्रात सदर सुरक्षारक्षक एका बंद दुकानाच्या बाहेर खूर्चीत बसलेला दिसून येतो आहे. आता एरवी ही खूप सामान्य बाब असती. कारण, घर, दुकान, ऑफिसेसबाहेर सुरक्षेत तैनात सुरक्षारक्षक सर्रास दिसून येतात. पण, हैराण करणारी ही बाब आहे की, यात त्या सुरक्षारक्षकाचे धडच दिसून येत नाही.

आता छायाचित्राचे रहस्य समजून घेण्यात लोकांना बराच वेळ लागला. नंतर असे कळाले की, तो सुरक्षारक्षक डुलकी घेत होता आणि यादरम्यान हळूहळू तो इतका मागे गेला की, त्याचा चेहराच छायाचित्रात दिसायचा बंद झाला. ही पोस्ट जवळपास 12 हजार युझर्सनी पाहिली आणि त्यावर अनेक प्रतिक्रियांची बरसातही झाली. काहींनी हे चित्र भीतीदायक असल्याची प्रतिक्रिया दिली तर काही युझर्सनी रहस्याचा योग्य उलगडा होणे गरजेचे होते, असेही मत नोंदवले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news