100 अब्ज सूर्यांपेक्षाही अधिक प्रकाशमान अवकाशीय घटना

100 अब्ज सूर्यांपेक्षाही अधिक प्रकाशमान अवकाशीय घटना
Published on
Updated on

`वॉशिंग्टन : खगोल शास्त्रज्ञांनी एका रहस्यमय प्रकाराच्या 'कॉस्मिक एक्सप्लोजन'चा म्हणजेच अवकाशीय स्फोटाचा शोध लावला आहे. या स्फोटाने आतापर्यंत शोधलेल्या सर्व 'सुपरनोव्हां'ना मागे टाकले आहे. ज्यावेळी एखाद्या तार्‍याचा मृत्यू होतो त्यावेळी अत्यंत तीव्र प्रकाश असलेला मोठा स्फोट होतो. त्यालाच 'सुपरनोव्हा' म्हटले जाते. मात्र, अशा स्फोटांपेक्षाही अनेक पटीने अधिक प्रकाशमान अशा स्फोटाचा हा नवा शोध आहे. तो शंभर अब्ज सूर्यांपेक्षाही अधिक प्रकाशमान आहे.

या वेगवान आणि तीव्र अशा घटनेला स्फोटाच्या एका नव्याच गटात वर्गीकृत करण्यात आले आहे. अशा स्फोटांचा यापूर्वी अभ्यास झालेला नव्हता. 'द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स'मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. बेलफास्टच्या क्वीन्स युनिव्हर्सिटीतील मॅट निकोल यांनी सांगितले की आम्ही या नव्या प्रकाराला 'ल्युमिनस फास्ट कूलर्स' किंवा 'एलएफसी'ज असे संबोधले आहे. हा काही सामान्य सुपरनोव्हाचा प्रकार नाही. ज्यावेळी सूर्यापेक्षा किमान आठपट अधिक मोठ्या असलेल्या महाकाय तार्‍यांच्या न्यूक्लिअर फ्युएलचा स्फोट होतो त्यावेळी 'सुपरनोव्हा' म्हटले जात असते. दरवर्षी खगोलशास्त्रज्ञ असे शेकडो सुपरनोव्हा पाहतात जे अचानक प्रकाशमान होऊन नंतर हळूहळू मंद प्रकाशाचे होत असताना दिसतात.

सहसा वीस दिवसांनंतर सुपरनोव्हाचा प्रकाश सर्वाधिक तीव— बनत असतो. त्यावेळी हा प्रकाश सूर्याच्या प्रकाशापेक्षा अनेक अब्ज पटीने अधिक असतो. पुढे काही महिन्यांनंतर तो हळूहळू मंदावतो. मात्र, 'एफएफसी'ज हे सुपरनोव्हा नसतात. अशी घटना अलीकडेच 'अ‍ॅटलास' टेलिस्कोप नेटवर्कच्या सहाय्याने हवाई, चिली आणि दक्षिण आफ्रिकेतून पाहण्यात आली होती. सूर्यासारख्या अनेक तार्‍यांनी भरलेल्या एका आकाशगंगेत ही घडली. क्वीन्स युनिव्हर्सिटीतील संशोधक शुभम श्रीवास्तव यांनी सांगितले की आमच्या डाटावरून हे दिसून येते की पृथ्वीपासून दोन अब्ज प्रकाशवर्ष अंतरावरील एका शक्तिशाली, लाल आकाशगंगेत ही घटना घडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news