पाकिस्तानचे ट्रोलिंग… यान पाठवले होते, पण! | पुढारी

पाकिस्तानचे ट्रोलिंग... यान पाठवले होते, पण!

कराची : भारताचे चांद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर अनेक देशांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानचे ट्रोलिंग करणारा एक व्हिडीओ मात्र आता चांगलाच व्हायरल होत राहिला आहे. संगणकावर तयार करण्यात आलेल्या या व्हिडीओत पाकिस्तानमधील काही जण काल्पनिक चित्राच्या माध्यमातून त्यावर आपले यान अंतराळात पाठवले गेल्याचे दाखवले आहे.

अतिशय हास्यास्पद ठरलेल्या या व्हिडीओेत पाकिस्तानी युवक चंद्रावर उतरल्याचे काल्पनिकचित्र रंगवले गेले आहे. पाकिस्तानातील काही जण अंतराळावर पोहोचले तर काय होईल, याचे मिश्किल चित्र या व्हिडीओत टिपले गेले आहे. रॉकेटमधून पाकिस्तानातून एका युवकाला चंद्राच्या दिशेने रवाना केले जाते आणि पृथ्वीवरील काही जण त्याला चंद्रावर कसे पोहोचायचे, याचे मार्गदर्शन करत असतात. व्हिडीओच्या शेवटी ती व्यक्ती आपण चंद्राऐवजी नरकात पोहोचल्याचे सांगतो, असे दाखवले गेले आहे.

Back to top button