जमिनीखाली उंच झाडांची अनोखी दुनिया | पुढारी

जमिनीखाली उंच झाडांची अनोखी दुनिया

बीजिंग : जमिनीवर उंच झाडे पाहणे ही काही नवलाईची बाब नाही. मात्र, जमिनीत मोठा खड्डा पडून त्यामध्ये अशी उंच झाडे असणे ही खरोखरच नवलाईची बाब आहे. चीनमध्ये असे द़ृश्य पाहायला मिळते. तिथे एका सिंकहोलमध्ये अशी झाडे आहेत आणि या खड्ड्यात एक अनोखी दुनियाच निर्माण झालेली आहे.

गेल्यावर्षी मे महिन्यात वैज्ञानिकांच्या एक टीमला हे सिंकहोल सापडले होते. हा 630 फूट खोलीचा खड्डा आहे. या खड्ड्यात एक वेगळेच विश्व तयार झालेले आहे. तिथे अनेक झाडे व स्वतःची एक इको-सिस्टीम आहे. प्राचीन काळापासूनच या खड्ड्यात अनेक झाडे व प्राणी राहत असावेत असे संशोधकांना वाटते. चीनमध्ये तीस सिंकहोल आहेत.

चायना जियोलॉजिकल सर्व्हेच्या इन्स्टिट्यूट ऑफ कार्स्ट जियोलॉजीचे वरिष्ठ इंजिनिअर झांग युआनहाई यांनी सांगितले की जमिनीखाली एक चांगले संरक्षित असे प्राचीन जंगलच आहे. इथे काही गुहाही आहेत. या सिंकहोलची लांबी 306 मीटर आणि रुंदी 150 मीटर आहे. या खड्ड्यात तब्बल 40 फूट उंचीची झाडेही आहेत.

Back to top button