तो स्नानही करतो विषारी सापांसोबत

नवी दिल्ली : जे साप पाहून बोबडी वळते, तेच साप घेऊन जर एखादी व्यक्ती स्टंट करत असेल, तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. असाच प्रसंग दाखविणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक माणूस एक-दोन नव्हे, तर तब्बल सहा सापांसोबत आरामात शॉवर घेताना दिसत आहे.
असे अनेक लोक असतात की, त्यांना कोणताही साप पाहून घाम फुटतो; तर असेही काही लोक या जगात आहेत की, ते विषारी सापांना पाळण्याचे धाडस करतात. या भयंकर धुडांसोबतच ते आरामात राहणे आणि झोपणेही पसंद करतात. त्यांना पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आपल्या गळ्यात अत्यंत धोकादायक असलेल्या दोन ते तीन सापांना अडकवून घेतले आहे. याशिवाय संपूर्ण बाथरूममध्येही अनेक साप आहेत. उल्लेखनीय म्हणजे, शरीरावरच्या सापांसोबत तो चक्क शॉवर घेताना दिसत आहे. हे साप अजगरासारखे दिसत आहेत. जरी ते विषारी नसले, तरी ते मानेभोवती विळखा घालून त्याचा झटक्यात जीव घेऊ शकतात. हा अत्यंत धोकादायक व्हिडीओ ळपषर्रीेींळींशुळश्रव नामक आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यर्ंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. यावर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.