न्यूयॉर्क : डोरेमॉनचे कार्टुन अनेक लहान मुलं आवडीने पाहत असतात. नोबिता नावाच्या मुलाला घेऊन हा 'भविष्या'तून आलेला मांजराच्या रूपातील रोबो हवे त्यावेळी 'टाईम ट्रॅव्हल' करू शकतो. कधी तो डायनासोरच्या काळात मागे जातो तर कधी भविष्यात! अर्थातच 'टाईम ट्रॅव्हल' ही एक कल्पनाच आहे व ती अनेक कादंबर्या, मालिका व चित्रपटांचा विषय बनलेली आहे. मात्र, आपण असे 'टाईम ट्रॅव्हल' म्हणजेच काळाचा प्रवास केल्याचा दावा करणारेही अनेक लोक आहेत. आता अशाच एका ट्राईम ट्रॅव्हलरने आपण पुढच्या सहा हजार वर्षांनंतरचे जग पाहून 2024 मध्ये परत आलो आहे असा दावा केला आहे! इतकंच नाही तर, 6000 वर्षांनंतर जगात काय बदल होतील याबाबत केलेल्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे.
या टाईम ट्रॅव्हलरने भविष्यातील सन 3977 म्हणजेच 6000 वर्षांनंतर जग पाहून परत आल्याचा दावा केला आहे. या व्यक्तीने 'अॅपेक्स टीव्ही'वर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती सन 6000 वर्षांनंतरचे जग पाहून 2023 मध्ये परत आल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओमध्ये या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. तसेच त्याचा आवाज देखील अत्यंत विचित्र आहे. 6000 वर्षांनंतरचे जग पाहून परत आलेल्या टाईम ट्रॅव्हलरने खळबळजनक दावे केले आहेत. या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्रास वापर केला जाईल असे या टाईम ट्रॅव्हलरचे म्हणणे आहे. 1990 च्या दशकात तयार करण्यात आलेल्या गुप्तचर योजनेचा आपण एक भाग असल्याचे या टाईम ट्रॅव्हरलचे म्हणणे आहे.
लोकांना भविष्यात पाठवण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती असा दावा देखील त्याने केला आहे. भविष्यातील लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात जगतील. येथील सरकार एआय टेक्नॉलॉजीवर काम करेल, औषधे आधुनिक जीवन जुन्यासारखे बनविण्याचे काम करतील. वॉटर कलर पेंटिंगसारखे दिसणारे शहराचे चित्र देखील त्याने दाखवले. मात्र, या प्रवासादरम्यान काही मित्र भविष्यात अडकले आहेत, ते वर्तमानात परत येऊ शकले नाहीत आणि ते कधीही परत येऊ शकणार नाहीत असे सांगताना या व्यक्तीला रडू कोसळले. भविष्यात मानव 'टाईम ट्रॅव्हलर' बनू शकतो असे दावा देखील या व्यक्तीने केला आहे.