Diabetes control : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फिटनेस बँडची मदत

Diabetes control : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फिटनेस बँडची मदत
Published on
Updated on

जिनिव्हा : जगभरात सध्या मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. भारत तर 'मधुमेहाची जागतिक राजधानी' बनत चालला आहे. अशा स्थितीत आता एक फिटनेस बँड या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करू शकते असे संशोधकांनी म्हटले आहे. स्वित्झर्लंडच्या इटीएच रिसर्च युनिव्हर्सिटीनुसार आरोग्यासंबंधी उपकरण माहिती एकत्र करण्यासोबत आपला उपचार करण्यातही सक्षम होऊ शकते.

संशोधकांनी सांगितले की, 'वेअरेबल' म्हणजेच शरीरावर परिधान करता येण्यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे सध्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशाच मनगटी फिटनेस बँडच्या सहाय्याने व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित माहिती आपण एकत्र करू शकतो आणि त्याच्या आधारावर उपचारही करू शकतो. मात्र, सध्या इलेक्ट्रॉजेनेटिक इंटरफेसच्या कमतरतेमुळे या उपकरणांना जीन-आधारित उपकरणांसाठी थेट प्रोग्राम करू शकत नाही. मात्र, आता या समस्येवर उपाय निघाला आहे. या नव्या तंत्रज्ञानाला डार्ट (डायरेक्ट करंट अ‍ॅक्चुएटेड रेग्युलेशन टेक्नॉलॉजी) नावाने ओळखले जाते.

या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे डिजिटल तंत्रज्ञान आणि आपली जैविक संस्थेचे अ‍ॅनालॉग तंत्रज्ञान एकत्र आणते. आपण जीन्सच्या एका निश्चित समूहासोबत जन्म घेतो. तसे पाहता जेनेटिक कोडमध्ये बहुतांश बदल होत नाही. मात्र, वाढते वय आणि आपल्या सवयीतील बदलामुळे यात थोडा बदल येऊ शकतो. डार्ट काही बदलास पुन्हा पूर्वीसारखे करू शकते. या संशोधनादरम्यान संशोधक डायबिटिक उंदराचा रक्तशर्करा सामान्य पातळीपर्यंत आणण्यात यशस्वी झाले. हे तंत्रज्ञान इन्सुलिनच्या उत्पादनाला थेट प्रोत्साहित करून मधुमेह नियंत्रित करण्यात मदत करू शकते.

संशोधकांना विश्वास आहे की, इन्सुलिनच्या उत्पादनाशिवाय हे तंत्रज्ञान उर्वरित स्थितीला तोंड देण्यासाठी यात विकास होऊ शकतो. या तंत्रज्ञानातून अ‍ॅक्यूप्रेशर सुयांनी इलेक्ट्रॉनिक पल्सला(विजेचा छोटा करंट) पाठवून निवडलेल्या जीन्सना सक्रिय केले जाईल. यामुळे जेनेटिक्सशी संबंधित अनेक प्रकारच्या स्थितींवर उपचार संभाव्य पातळीवर मदत मिळू शकेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news