समुद्रकिनारी ‘राक्षस?’ | पुढारी

समुद्रकिनारी ‘राक्षस?’

पनामा : येथील एका महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवर नजर पडताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहिला नाही. व्हिडीओत समुद्र किनार्‍यावर राक्षसासारखी आकृती असणारा एक प्राणी दिसून येत होता. हा व्हिडीओ अतिशय वेगाने व्हायरल होणे साहजिकच होते. काही नेटिझन्सनी याला ‘राक्षस’ असे नाव दिले. पण, व्हिडीओेतील तथ्य काही वेगळेच होते आणि ज्यांनी हे छायाचित्र पाहिले, त्यांची पूर्ण दिशाभूल झाली आहे, हे स्पष्ट झाले.

पनामाची 32 वर्षीय युवती – ब्रेंडा गोंजालेज ही किनार्‍यावर फिरत होती. याचवेळी तिला अचानक विचित्र प्राणी दिसला. तिने लगोलग कॅमेरा बाहेर काढत व्हिडीओे केला आणि हा व्हिडीओे व्हायरलही झाला. काही अवधीतच जवळपास 26.4 दशलक्ष जणांनी हा व्हिडीओ पाहिला. काहींनी या प्राण्याला ‘रेतीत पहुडलेला राक्षस’ असे म्हटले. पण, प्रत्यक्षात ते एक चार वर्षांचे श्वान होते. लॉलिता असे त्याचे नाव असल्याचे ब्रेंडाने यावेळी स्पष्ट केले.

आपण यासारखे अनेक व्हिडीओ यापूर्वी सातत्याने शेअर केले असून, त्याला नेटिझन्सचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे ब्रेंडा याप्रसंगी म्हणाली. सध्या ब्रेंडाने हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला असून येथे तिचे 13 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Back to top button