इंद्रधनुष्य अर्धाकृती नव्हे, पूर्णाकृती ! | पुढारी

इंद्रधनुष्य अर्धाकृती नव्हे, पूर्णाकृती !

न्यूयॉर्क : आजवर इंद्रधनुष्यांचा मनमोहक नजारा अनेकदा पाहिला, अनुभवला असेल. वेगवेगळ्या रंगरूपरेषेतील इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर मन खूश होऊन जातं. पाऊस झाल्यानंतर बर्‍याचदा खुल्या आकाशात असे इंद्रधनुष्य मोहीत करतात. अर्थातच, ही सारी इंद्रधनुष्ये अर्धाकृतीच, पण प्रत्यक्षात इंद्रधनुष्य नेहमी अर्धाकृती नव्हे तर पूर्णाकृतीच असते, ही आश्चर्याची बाब ठरते.

एरवी आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य पूर्णाकृती, गोल असते. पण, आपल्याला ते अर्धगोल स्वरूपात दिसून येते. सोशल मीडियावर अलीकडेच एका युजरने पूर्णाकृती इंद्रधनुष्याचा व्हिडीओ पोस्ट केला, त्यावेळी लोक अक्षरश: हैराण झाले. हा खरा व्हिडीओ आहे, यावरच काहींचा विश्वास बसला नाही. अर्धाकृती इंद्रधनुष्य हे पारंपरिक झाले आहे. पण, इंद्रधनुष्य अर्धाकृती कधीच असत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

आता हे पूर्णाकृती इंद्रधनुष्य पहायचे असतील तर ते केवळ विमानातूनच शक्य होते. नासाने दिलेल्या माहितीनुसार, या रिफ्लेक्शनला ग्लोरी असे म्हटले जाते. विमानातून इंद्रधनुष्य पाहण्याची संधी मिळाली तर ते गोलाकृतीच दिसून येईल.

Back to top button