चक्क टॉयलेट पेपर खाणारी महिला! | पुढारी

चक्क टॉयलेट पेपर खाणारी महिला!

लंडन : जगाच्या पाठीवर विचित्र पदार्थ खाणार्‍या लोकांची संख्या काही कमी नाही. कुणी नट-बोल्ट खातो तर कुणी केस, कुणी माती खातो तर कुणी वाळू. मात्र, कुणाला टॉयलेट पेपरही खाण्याची सवय असेल असे आपल्याला वाटणार नाही. अमेरिकेत एका महिलेला अशी सवय आहे. ती एका वर्षात लाखो टॉयलेट पेपर फस्त करते!

या महिलेचे नाव आहे सकिना. ती रोज टॉयलेट पेपरचे चार रोल खाते. तिच्यासाठी टॉयलेट पेपर खाणे हे पीनट बटर म्हणजेच शेंगदाण्याचे लोणी तसेच जेली सँडविच खाण्यासारखेच चवदार आहे. टॉयलेट पेपरच्या चवीने आपल्या तोंडाला पाणी सुटते असे ती म्हणते. खरे तर या महिलेला एक अजब आजार आहे. त्याला ‘पिका’ असे म्हटले जाते. ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये रुग्ण विचित्र वस्तू खातात. त्यामध्ये माती, साबण अशांचा समावेश होतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार टॉयलेट पेपर खाणे हे मुळीच सुरक्षित नाही. असे कागद खाल्ल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Back to top button