Blue blood of crabs ‘या’ खेकड्याचे निळे रक्त आहे सर्वात महाग! | पुढारी

Blue blood of crabs ‘या’ खेकड्याचे निळे रक्त आहे सर्वात महाग!

न्यूयॉर्क : Blue blood of crabs सर्वच जीवांचे रक्त लाल रंगाचे असते असे नाही. ‘हॉर्स शू कॅ्रब’ असे नाव असलेल्या खेकड्याचे रंग चक्क निळ्या रंगाचे असते. इतकेच नव्हे तर हे निळे रक्त अतिशय महागही असते. या एक लिटर रक्ताची किंमत अकरा लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे.

हॉर्स शू खेकडा Blue blood of crabs हा दुर्मीळ प्रजातीचा असून ही प्रजाती जगातील सर्वात जुन्या प्रजातींपैकी एक आहे. हा खेकडा पृथ्वीवर सुमारे 45 कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे. अटलांटिक, हिंद आणि प्रशांत महासागरात हे खेकडे आढळतात. साधारणपणे मे ते जून या काळात म्हणजेच वसंत ऋतूत ते दिसून येतात. पौर्णिमेच्या रात्री भरतीच्या लाटांबरोबर ते किनार्‍यावरही येत असतात. त्यांच्या रक्ताला जगातील सर्वात महागडा तरल पदार्थ म्हटले जाते. या खेकड्याच्या रक्ताचा वापर वेगवेगळी औषधे बनवण्यासाठी केला जातो. 1970 पासून असा वापर सुरू झाल्याचे सांगितले जाते.

या रक्ताच्या माध्यमातून वैज्ञानिक उपकरणे आणि औषधे जीवाणूरहीत असल्याचीही तपासणी केली जाते. दरवर्षी पाच कोटी हॉर्स शू खेकड्यांचा Blue blood of crabs वापर वैद्यकीय कामांसाठी केला जात असतो. या खेकड्याच्या निळ्या रक्तात तांबे असते. तसेच एक खास रसायनही असते जे कोणत्याही जीवाणूच्या आजुबाजूला जमा होते आणि त्यांचा छडा लावते. हॉर्स शू खेकड्यांचे रक्त त्यांच्या हृदयाजवळ छिद्र बनवून काढले जाते. एका खेकड्यातून सुमारे तीस टक्के रक्त काढले जाते आणि नंतर त्याला समुद्रात सोडून दिले जाते.

Back to top button