हवेच्या प्रदूषणामुळे दहा वर्षे आधीच येत आहे वृद्धत्व | पुढारी

हवेच्या प्रदूषणामुळे दहा वर्षे आधीच येत आहे वृद्धत्व

लंडन : हवेच्या प्रदूषणाचे अनेक घातक परिणाम समोर येत असतात. आता संशोधकांनी म्हटले आहे की हवेच्या प्रदूषणामुळे लोकांना दहा वर्षे आधीच वृद्धत्व येत आहे. प्रदूषित हवेच्या संपर्कात येणार्‍या लोकांना ‘कोव्हिड-19’ मध्ये अगदी तसेच अनुभव मिळाले जे त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या लोकांना आले. ताज्या व शुद्ध हवेत श्वासोच्छ्वास करणार्‍या रुग्णांच्या तुलनेत प्रदूषित हवेत श्वास घेणारे रुग्ण चार दिवस अधिक हॉस्पिटलमध्ये राहतात.

प्रदूषित हवा लोकांची श्वासनलिका आणि फुफ्फुसांवर थेट परिणाम करीत आहे. त्यामुळे अस्थमासारख्या (दमा) आजारांचा धोका वाढला आहे. एका संशोधनात म्हटले आहे की वातावरण आणि डिप्रेशन यांचा परिणाम आयुष्यभर लोकांवर राहतो. मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार आर्थिक आणि सामाजिक रूपाने वंचित असलेल्या शहरी भागात राहणे तसेच डिप्रेशनच्या विळख्यात असणे यामुळे माणूस अकालीच वृद्ध होत असतो.

वातावरण आणि जैविक वयाचा हा परस्पर संबंध आरोग्य आणि वर्तनासंबंधी धोक्याच्या घटकांचे विश्लेषण केल्यावरही टिकून राहतो. बेल्जियममध्ये झालेल्या एका संशोधनानुसार हवेच्या प्रदूषणामुळे लोक 36 टक्के अधिक आजारी पडतात. डेन्मार्कमधील एका संशोधनानुसार हवेच्या प्रदूषणामुळे ‘कोव्हिड-19’ रुग्णांचा मृत्यू होण्याचा धोका 23 टक्क्यांनी वाढला आहे.

Back to top button