जगातील सर्वात उंच काचेचा पूल

जगातील सर्वात उंच काचेचा पूल

बीजिंग : जगभरात काही काचेचे पूलही आहेत. काही पूल हे उंच कड्यावरील 'स्कायवॉक'च्या स्वरूपात आहेत. मात्र, चीनमध्ये उंच पर्वतांच्या दोन कड्यांना जोडणारा काचेचा पूल आहे. हा जगातील सर्वात उंच आणि लांब काचेचा पूल आहे. अतिशय जाड व भक्कम काचेपासून हा पूल बनवलेला आहे. 2016 मध्ये हा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता.

चीनच्या हुनान प्रांतातील झांगजियाजी दरीवर चीनने हा जगातील सर्वात उंच आणि सर्वात लांब काचेचा पूल बांधला आहे. या पुलाची लांबी 1 हजार 410 फूट असून जमिनीपासून तो तीनशे मीटर उंचीवर आहे. हा पूल 20 ऑगस्ट 2016 पासून सर्वांसाठी खुला करण्यात आला आणि पहिल्याच दिवशी हजारो लोकांनी हा पूल पाहण्याचा आनंद घेतला. हा पूल पाहण्यासाठी रोज साधारण आठ हजार पर्यटकांनाच या पुलावरून जाण्याची परवानगी आहे.

काचेचा हा पूल तियानमेन माऊंटेन नॅशनल पार्कमध्ये असलेल्या दोन खांबांवर उभा आहे. या पुलाचे डिझाईन इस्रायली वास्तू शास्त्रज्ञांकडून तयार करून घेतले आहे. या पुलावरून चालणारे पर्यटक तीन स्तर असलेल्या 99 काचेच्या पट्ट्यांहून चालतात. हा पूल सामान्य नागरिकांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी काही शक्तिशाली पुरुष आणि महिलांकडून तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news