सॅटेलाईटसारखे काम करणारे 150 किलोंचे ड्रोन

150 किलोंचे ड्रोन
150 किलोंचे ड्रोन
Published on
Updated on

लंडन : ब्रिटनमधील एका कंपनीने सॅटेलाईटशी स्पर्धा करणार्‍या सोलर-इलेक्ट्रिक ड्रोनची निर्मिती केली आहे. 'पीएचएएसए-35' नावाचे हे ड्रोन सॅटेलाईटपेक्षाही सरस असल्याचा कंपनीचा दावा आहे. लवकरच ते सॅटेलाईटची जागाही घेऊ शकेल असेही कंपनीचे म्हणणे आहे. हे ड्रोन पांडाच्या वजनाइतके म्हणजेच केवळ 150 किलोंचे आहे. एखाद्या सॅटेलाईटचे वजन हजारो किलोंचे असते. हे ड्रोन बनवण्यासाठीचा खर्चही तुलनेने अतिशय कमी आहे.

सॅटेलाईट म्हणजेच कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीच्या वातावरणाच्या चौथ्या स्तरात स्थित असतात. या स्तराला 'थर्मोस्फियर' असे म्हटले जाते. याठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती नसते व त्यामुळे ते पृथ्वीच्या कक्षेत फिरत असतात. या सॅटेलाईटस्ना बॅटरीच्या माध्यमातून ऊर्जा मिळते. ही बॅटरी सॅटेलाईटस्ना जोडलेल्या सोलर पॅनेलच्या सहाय्याने चार्ज होत असते. बॅटरीचे आयुष्य संपल्यावर हे सॅटेलाईट निकामी होतात. त्यामुळे अंतराळात ते निव्वळ एक कचरा म्हणून राहतात. 'पीएचएएसए-35' हे ड्रोन वातावरणाच्या दुसर्‍या स्तरात म्हणजेच 'स्ट्रॅटोस्फियर'मध्ये स्थित असतात. याठिकाणी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती कार्यरत असते. त्यामुळे त्याला अवकाशात स्थित राहण्यासाठी पंख फिरवत राहावे लागते. त्याचे पंख म्हणजेच सोलर पॅनेल्स आहेत. ते दिवसा सूर्याच्या ऊर्जेने फिरतात तसेच बॅटरीही चार्ज करतात.

रात्रीच्या वेळी हे ड्रोन बॅटरीच्या ऊर्जेवर काम करते. एका वर्षात त्याच्या बॅटरीचे आयुष्य संपण्यापूर्वीच त्याला जमिनीवर उतरवले जाऊ शकते. त्याचे पंख 115 फूट लांबीचे आहेत. त्यामध्ये सोलर पॅनेल बसवले आहेत. या ड्रोनमध्ये कॅमेरा, सेन्सर, कम्युनिकेशन इक्विपमेंट यासारखे 15 किलोंपर्यंतचे सामान ठेवता येऊ शकते. ज्याठिकाणी इंटरनेटसारख्या सुविधा पोहोचत नाहीत, अशा दुर्गम ठिकाणीही ते 4-जी आणि 5-जी कम्युनिकेशन सुविधा देण्यास सक्षम आहे. ड्रोनचे वजन बरेच कमी असल्याने त्याला सॅटेलाईट टेक्नॉलॉजीला पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

स्ट्रॅटोस्फियरमध्ये राहिल्याने ते पर्यावरण निगराणी, आपत्ती काळातील मदत, सीमा सुरक्षा, सागरी व सैन्य टेहळणी यासाठी सहाय्य करू शकते. दीर्घकाळ गुप्त माहिती देणे, लष्करी निरीक्षण यासाठीही ते मदत करू शकते. यामध्ये विशिष्ट प्रकारचे सेन्सर बसवता येऊ शकतात जे अंतराळातून माहिती गोळा करून अलर्ट देतील. उदा. जंगलांची निगराणी करण्यासाठीचे सेन्सर्स. ते झाडांच्या आर्द्रतेचा स्तर मॉनिटर करून फॉरेस्ट फायरला अलर्ट करू शकतात. या ड्रोनने 25 जूनला पहिल्यांदा उड्डाण केले होते. त्यावेळी ते 70 हजार फूट उंचीपर्यंत म्हणजे आपल्या मॅक्झिमम केपेबल अल्टिट्यूडपर्यंत उडाले होते. दुसर्‍यांदा 13 जुलैला त्याने न्यू मेक्सिकोमधून उड्डाण केले. त्यावेळी ते 66 हजार फुटांपर्यंत उडाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news