प्राण्यांचे दात का नाही किडत? | पुढारी

प्राण्यांचे दात का नाही किडत?

नवी दिल्ली : कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की प्राणी कधीही दात घासत नाहीत, तरीही त्यांचे दात किडत का नाहीत? याचे उत्तर आपल्याच काही वाईट सवयींमध्ये आणि प्राण्यांच्या आहारातील काही चांगल्या सवयींमध्ये दडलेले आहे.

दात हा सजीवाच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दात नसतील तर अन्न ग्रहण करणे शक्य नाही. कारण दातांनीच अन्नाचे चर्वण करून मगच ते पोटात जाते. यामुळे दातांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, सध्या अनेक जण दातांशी निगडीत समस्यांनी त्रस्त आहेत. अनेक जण नियमित ब्रश करत असून देखील त्यांचे दात किडतात. प्राणी ब्रश करत नाहीत मग त्यांचे दात किडत का नाही? प्राण्यांच्या दाताचे आरोग्य चांगले राहण्याची कारणे अशी : प्राणी कच्चे पदार्थ अर्थात जास्त फायबर असलेले अन्न, ताजी फळे खातात.

त्यामुळे आपोआपच त्यांचे तोंड स्वच्छ होते.चिकट गोड पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या तोंडात ‘एस म्युटन्स’ नावाच्या बॅक्टेरियल प्रजातीचे प्रमाण वाढून दात किडतात. प्राणी मात्र गोड पदार्थ खात नाहीत. तसेच प्राणी हे अतिगरम किंवा थंड पदार्थांचे सेवन करत नाहीत. प्राणी पिझ्झा, बर्गर यासारखे फास्ट फूड तसेच तळलेले पदार्थ खात नाहीत. व्यसनाचे अतिशय वाईट परिणाम तोंडातील हिरड्यांवर आणि दातांवर होतात. प्राण्यांना असे कोणत्याच प्रकारचे व्यसन नसते. प्राण्यांच्या तोंडातील ‘पीएच’ पातळी ही नैसर्गिकतः जास्त असते त्यामुळे अ‍ॅसिडिक ‘पीएच’ नसल्याने त्यांच्यामध्ये दातांच्या समस्या उद्भवत नाहीत.

संबंधित बातम्या
Back to top button