चक्क ‘एटीएम’मध्ये घुसला साप!

एटीएम
एटीएम

नवी दिल्ली : पावसाळ्यात अनेक ठिकाणी सर्प दिसून येत असतात. आता तर चक्क एका एटीएममध्ये साप घुसल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी गेली असता तिला हे द़ृश्य दिसले व त्याने हा व्हिडीओ बनवला.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक साप अचानक एटीएम मशिनमध्ये शिरत आहे. हा साप आधी मशिनवर सरपटतो आणि नंतर तिथे असलेल्या एका छिद्रात शिरतो. काही सेकंदांमध्येच तो पूर्णपणे त्या छिद्रातून मशिनमध्ये जातो. त्यानंतर काय घडले हे समजू शकलेले नाही. अर्थातच हे मशिन उघडून हा साप बाहेर काढला गेला असावा हे नक्की!

मात्र हा प्रकार पाहून संबंधित माणसाला धक्काच बसला. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून तो व्हायरलही होत आहे. त्यावरून काही लोक मीम्सही बनवत आहेत. काही लोकांनी यावर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. पैसे काढण्यासाठी हा साप मशिनमध्ये गेला असावा असेही काहींनी म्हटले!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news