स्तनपान : आई व बाळाच्या मेंदूवर सकारात्मक परिणाम | पुढारी

स्तनपान : आई व बाळाच्या मेंदूवर सकारात्मक परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकन वैज्ञानिकांनी म्हटले आहे की स्तनपानाचा आई व बाळ अशा दोघांच्याही मेंदूसाठी सकारात्मक परिणाम होतो. आईचे दूध पिणार्‍या बाळाची विचारक्षम ता घटण्याचा धोका यामुळे कमी होतो. तसाच परिणाम आईबाबतही घडत असतो. याबाबत कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संशोधन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की ज्या महिला बाळाला स्तनपान करीत नाहीत त्यांच्या तुलनेत स्तनपान करणार्‍या महिलांच्या बाळांची वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याची, विचार करण्याची क्षमता अधिक असू शकते.

संशोधक मॉली फॉक्स यांनी सांगितले की यापूर्वी झालेल्या अनेक संशोधनांमधून असे दिसले आहे की आईच्या दुधामुळे बाळ दीर्घकाळ निरोगी राहते.

मात्र, आमचे संशोधन स्तनपानामुळे आईच्या आरोग्यावरही कसा परिणाम होतो हे दाखवणारे आहे. ज्या महिला स्तनपान करतात त्यांचा मेंदू वयाच्या पन्नाशीत असताना स्तनपान न केलेल्या महिलांच्या तुलनेत अधिक चांगल्या प्रकारे काम करतो. वयाच्या पन्नाशीत विचारक्षमतेत घट होऊ लागते असे मानले जाते.

अल्झायमर्स आणि डिमेन्शियासारख्या विस्मरणाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होते. अमेरिकेत दोन तृतियांश महिला या समस्येशी झुंजत आहेत. आईचे दूध पिल्याने बाळांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, संक्रमणाचा धोका कमी होतो आणि त्यांची श्वसनसंस्थाही चांगल्या प्रकारे काम करते. तसेच अशा मुलांचा बुद्ध्यांकही चांगला राहतो.

Back to top button