दिवसातून ८ वेळा चहा प्या अन् शतायुषी व्हा! | पुढारी

दिवसातून ८ वेळा चहा प्या अन् शतायुषी व्हा!

लंडन : चहा पिणे केवळ आपल्याला ताजेतवाने ठेवत नाही तर शतायुषी देखील करू शकते, असे आयरिन स्प्रोटन यांचे मत आहे. अलीकडेच आयरिन यांनी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला असून शतायुषी होण्याचे सर्व श्रेय ते चहाला देतात. एरव्ही, विदेशात केक कापून, शॅम्पेन उडवून वाढदिवसाचा आनंद साजरा केला जातो. ग्लासला ग्लास भिडवून पेग रिचवले जातात. येथे मात्र चहाप्रेमी आयरिन यांनी आपल्या पसंतीच्या टायफू चहाचा आनंद घेत आपल्या कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारासह 100 वा वाढदिवस साजरा केला.

आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य उलगडताना त्या म्हणाल्या, ‘मी 100 वर्षांपर्यंत पोहोचेन, असे वाटले नव्हते; पण कदाचित मी म्हातारपण रोखण्यात यश मिळवले. आतापर्यंतच्या वाटचालीत स्वत:ला नेहमी बिझी ठेवले. कधीही आरामात राहिले नाही. आयुष्यात अनेक चढ-उतार असतात; पण आपण नेहमी चालत रहायचे असते. मी दिवसाची सुरुवात चहाने करते आणि दिवसातून 8 कप चहा पिणे हा माझ्या दिनचर्येचा एक भाग असतो. चहामुळे मी नेहमी ताजेतवानी राहते आणि हेच माझे आतापर्यंतच्या वाटचालीचे रहस्य आहे’.

Back to top button