

न्यूयॉर्क : ध्रुवांवर दिसणारे प्रकाश नेहमीच संशोधकांना आपल्याकडे लक्ष वेधून घेत आले आहेत. अलीकडे, नव्यानेच हिरव्या प्रकाशाचा एक नवा ऑरा आढळून आला असून यामुळे संशोधकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अलीकडेच झालेल्या एका शास्त्रीय अभ्यासात, कार्बन डायऑक्साईडशी संलग्न नव्या प्रकारचा प्रकाशझोत आढळून आला होता. पूर्ण जगभरात हा प्रकाशझोत आढळून आला असून यामुळे पारंपरिक विचारधारेलाही बदलून टाकले आहे.
एरव्ही, असे प्रकाशझोत पृथ्वीच्या वायुमंडळात नायट्रोजन व ऑक्सिजन गॅसच्या माध्यमातून तयार होतात. मात्र, आता कार्बनडाय ऑक्साईडशी संलग्न प्रकाशझोत हा नवा शोध ठरतो आहे. रॉयल म्युझियम ग्रीनविचने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यापासून चार्ज पार्टिकल पृथ्वीच्या वायुमंडळात ऑक्सिजन व नायट्रोजनशी धडकतात, त्यावेळी त्याचा प्रकाशझोत तयार होतो. या प्रकाशझोताशी संबंधित अभ्यास या उद्देशाने करण्यात आला की, भौतिक प्रक्रिया आणि पृथ्वीच्या वायुमंडळात ऊर्जाशील कणांच्या धडकेतून नेमकी काय उत्पत्ती होते, हे जाणून घेता यावे.
या अभ्यासासाठी संशोधकांनी 'नासा'च्या अॅक्वा सॅटेलाईटच्या माध्यमातून मिळालेल्या 20 वर्षांच्या डाटाचा अभ्यास केला, जो 2002 मध्ये लाँच केला गेल्यानंतर माहिती एकत्रित करत होता. उपग्रहाच्या वायुमंडळीय इन्फ्रारेड साऊंडर उपकरणाने प्रकाशझोताशी संलग्न 4.26 मायक्रोनवर कार्बन डायऑक्साईड इन्फ्रारेड उत्सर्जनाचा शोध लावला. एरिजोना स्टेट युनिव्हर्सिटीनुसार 'नासा'च्या एक्वा उपग्रहावर हे उपकरण पूर्ण वायुमंडळाचे तापमान, बाष्पीभवन, ट्रेस गॅसबरोबरच आणखी विस्तूत तपशील पुरवते. साहजिकच, संशोधकांना याचे आणखी विश्लेषण करता येणार आहे.