

बर्लिन : एखाद्या इमारतीला छेद देऊन रोज प्रवास करणारी रेल्वे आपण निश्चितच पाहिली नसेल. क्षणभर विचार करायला लावणारी ही संकल्पना आहे. पण, चीनमध्ये हे शक्य देखील झाले असून या तंत्राने सर्वांनाच थक्क करून टाकले आहे.
चीनमधील एका 19 मजली इमारतीतून चक्क रेल्वेसाठी ट्रॅक तयार केला गेला असून आश्चर्य म्हणजे ही इमारत निवासी संकुल आहे आणि तरी ही इमारत जणू रेल्वे स्टेशनप्रमाणेच झाली आहे. मुळातच, चीनमधील रेल्वे सिस्टीम अतिशय जबरदस्त आहे. तेथे एका 19 मजली इमारतीत सहाव्या व आठव्या मजल्यावरून रेल्वे रोज जाते. आता जगासाठी हे आश्चर्य असले तरी चीनमध्ये वर्षांनुवर्षे या मार्गावरून ट्रेन रोज धावत आहे.
इमारतीमधून जाणारा रेल्वे ट्रॅक चीनमधील माउंटेन सिटी चंक्विंगमध्ये आहे. या शहरात बहुतांशी इमारती टोलेजंग असून तेथे जागेची कमी आहे. उंचावर रेल्वे ट्रॅक तयार करताना देखील 19 वा मजला आड आला आणि यावर मार्ग काढण्यासाठी तेथील अभियंत्यांनी चक्क बिल्डिंगमधून ट्रॅक निर्माण करण्याचा फंडा काढला अन् ते यात यशस्वी देखील झाले.
आता रेल्वे इमारतीतून जाणार म्हणजे त्याचा आवाज तर येणारच. पण, यावरही उपाय करत चीनने सायलेन्स टेक्नॉलॉजीचा अवलंब केला. आता या ट्रेनचा तिथे आवाजच येत नाही. आश्चर्य म्हणजे या इमारतीत राहणार्या वेगवेगळ्या मजल्यावरील लोकांना वेगवेगळे स्टेशन मिळतात. चीन अलीकडे हायटेक रेल्वेचा बराच विस्तार करत असून जगातील पहिले ट्रॅकलेस ट्रेनही चीनमध्येच प्रत्यक्षात साकारले गेले आहे. इमारतीतून प्रवास करणारी ही रेल्वेही अर्थातच लक्षवेधी ठरत आली आहे.