दिव्यांगांच्या मदतीसाठी रोबो कार | पुढारी

दिव्यांगांच्या मदतीसाठी रोबो कार

न्यूयॉर्क : इन्स्टाग्रामवर अनेक अजब व्हिडीओ पोस्ट केले जातात. अगदी अलीकडेच, दिव्यांगांसाठी उपयुक्त कारचा व्हिडीओ अपलोड केला गेला असून यात एक महिला कारमधून उतरताना दिसून येते आहे.

वास्तविक, धडधाकट नसलेली व्यक्तीही आपल्या आयुष्याला सकारात्मक पैलू देऊ शकते. यामुळे, आपले आयुष्य त्यांना वेगळ्या पद्धतीने जगता येते. पण, अशा लोकांसाठी सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे प्रवासाचे.

ज्यांचे पाय अधू असतात, त्यांना व्हीलचेअरची आवश्यकता भासते. दूर जाण्यासाठी त्यांना स्वत: गाडी चालवता येणे शक्य नसते. काही वेळा तरी अगदी गाडीत चढणे देखील शक्य होत नाही. याच अडचणी ओळखून एक अनोखी कार आणली गेली आहे. बाहेरून ही कार नेहमीसारखीच दिसेल. पण, ज्यावेळी त्याचे फिचर्स दिसून येतील, त्यावेळी आश्चर्य वाटेल.

या कारचे दरवाजे स्वयंचलित असून केवळ बटण दाबून त्याची उघडझाप करता येते आणि दरवाजा वर जात असल्याने मागील बाजूला बसणे देखील सहज शक्य होते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या कारमधील सीट बटण दाबल्यावर आणखी बाहेरील बाजूस येते आणि यामुळे दिव्यांग व्यक्तीला बसण्यास मदत होते. त्यानंतर ही सीट पुन्हा बटण दाबून आत घेता येते व दरवाजा बंद केला जातो. खास दिव्यांगांसाठी तयार केल्या गेलेल्या या कारला 44 हजारपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Back to top button