भारताबाहेरही आहे एक ‘अयोध्या’! | पुढारी

भारताबाहेरही आहे एक ‘अयोध्या’!

बँकॉक : प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रसार तत्कालीन बृहदभारतात सर्वदूर झालेला होता. त्याच्या खुणा आजही पाहायला मिळतात. थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया यासारख्या आग्नेय आशियातील देशांनी या खुणा आजही जपून ठेवलेल्या आहेत. इंडोनेशियातील रामायणावर आधारित नृत्यनाटिका आजही लोकप्रिय आहेत. थायलंडमध्ये तर प्रत्येक राजाचे नाव ‘राम’ असते आणि तिथेही एक ‘अयोध्या’ आहे!

थायलंडमध्ये चक्री राजवंशाच्या प्रत्येक राजाला ‘राम’ ही उपाधी असते. हे नाव भगवान विष्णूचा अवतार असलेल्या दाशरथी रामावरूनच घेण्यात आलेले आहे. सध्याचे थायलंडचे राजा महा वजिरालोंगकोर्न हे आहेत. त्यांना ‘राम दशम’ असे म्हटले जाते. त्याचा अर्थ ते राजवंशाच्या दहाव्या पिढीतील राजे आहेत. त्यांचा राज्याभिषेक सन 2019 मध्ये झाला होता. राजा भूमिबोल यांच्या दीर्घकालीन राजसत्तेनंतर ते राजे झाले. वजिरालोंगकोर्न यांच्याकडे 43 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

जगातील सर्वात श्रीमंत शासकांमध्ये त्यांची गणना होते. थायलंडमधील एका शहराचे नाव ‘अयुत्थया’ असे आहे. हा ‘अयोध्या’ शब्दाचाच अपभ्रंश आहे. या शहराला ‘थायलंडची अयोध्या’ म्हणूनच ओळखले जाते. थायलंडच्या धार्मिक ग्रंथाचे नाव ‘रामकीन’ असे आहे. त्याला ‘थायी रामायण’ म्हणून ओळखले जाते.

Back to top button