पृथ्वीच्या भेटीला मोठे लघुग्रह | पुढारी

पृथ्वीच्या भेटीला मोठे लघुग्रह

वॉशिंग्टन : पृथ्वीजवळून वेळोवेळी अनेक लघुग्रह जात असतात. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवरून डायनासोरचे साम—ाज्य उद्ध्वस्त झाले होते. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांच्या दरम्यान अशा अवकाशीय शिळांचा एक पट्टाच आहे. त्याला ‘अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट’ म्हणूनच ओळखले जाते. आताही दोन लघुग्रह पृथ्वीच्या भेटीला आले आहेत.

‘नासा’ च्या माहितीनुसार या दोन लघुग्रहांना 488453 (1994 एक्सडी) आणि 2020 डीबी 5 अशी नावे देण्यात आली आहेत. लघुग्रह ‘488453 (1994 एक्सडी) 12 जूनला पृथ्वीच्या जवळ येऊन गेला तर ‘2020 डीबी 5’ हा 15 जूनला पृथ्वीच्या जवळ येणार आहे. ‘नासा’ने याविषयी सविस्तर माहिती दिली. हे दोन्ही लघुग्रह धोकादायक असल्याचे म्हटले जाते; कारण या लघुग्रहांचा व्यास 150 मीटरपेक्षा अधिक आहे.

लघुग्रह 488453 (1994 एक्सडी) हा 77,292 कि.मी. प्रतितासाच्या वेगाने पृथ्वीजवळून जाणार असल्याचे म्हटले जात होते. तो पृथ्वीच्या 31,62, 498 कि.मी. अंतरावरून गेला, असे म्हटले जात आहे. लघुग्रह (2020 डीबी 5) 34,272 कि.मी. प्रतितासाच्या वेगाने पृथ्वीजवळून जाणार आहे. पृथ्वीजवळून हा लघुग्रह 43, 08,418 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे. लघुग्रह सहसा पृथ्वीवर कोणताही धोका निर्माण करत नाही, मात्र सतर्क राहणेही तितकेच महत्त्वाचे असते. ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीनुसार यानंतर आणखी एक लघुग्रह पृथ्वीकडे 2 मे 2024 रोजी येणार आहे.

Back to top button