अविरत इंटरनेटसाठी ‘नासा’चे नवे मिशन | पुढारी

अविरत इंटरनेटसाठी ‘नासा’चे नवे मिशन

सॅन फ्रान्सिस्को : ‘नासा’ने संभाव्य इंटरनेट सर्वनाश रोखण्यासाठी प्रयत्नाचा एक भाग म्हणून अंतराळ यान लाँच केले आहे. ‘मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन अंतराळ एजन्सी पार्कर सोलर प्रोबने पीएसपी सौर हवेच्या माध्यमातून नेविगेट करण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. संशोधकांनी आगामी सौर तुफानाच्या संभाव्य प्रभावाबद्दल इशारा दिला असून, याला प्रामुख्याने इंटरनेट सर्वनाश असे संबोधले जाते. पुढील दशकभरात हा धोका संभवतो. 2018 मध्ये लाँच केले गेलेले अंतराळ यान सूर्याच्या नजीक असून, तेथेच सौर हवेची निर्मिती होते.

सारे कम्युनिकेशन कसे ठप्प होऊ शकते?

मिळालेल्या वृत्तानुसार, सौर हवेत सूर्याच्या बाहेरील वातावरणातून आवेशित कणांची एक धारा निघत असते. त्याला कोरोना असेही म्हटले जाते. प्रचंड उष्णता आणि विकिरणांच्या प्रतिकूल परिस्थितीतही पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या कार्यप्रणालीबाबत महत्त्वाची माहिती एकत्रित करत राहिला आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रा. स्टुअर्ट बेल यांनी सौर हवेचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, सूर्याची बरीच माहिती हवा पृथ्वीपर्यंत घेऊन जात असते. यामुळे सूर्याच्या हवेमागील तंत्र समजावून घेणे पृथ्वीवरील व्यावहारिक कारणामुळे महत्त्वाचे ठरते. सूर्य ऊर्जा कशी प्रदान करतो आणि भू-चुंबकीय तुफान कसे चालते, हे पाहिले तर लक्षात येईल की, आपल्या संचार नेटवर्कला धोका आहे. अशा घटनांमुळे कित्येक महिने किंवा कित्येक वर्षे इंटरनेट बंद होऊ शकते. शिवाय, उपग्रह, विजेच्या लाईन खराब होऊ शकतात.

‘नासा’चे नवे मिशन

यादरम्यान, ‘नासा’ने नवे मिशन सुरू केले असून, त्यात पुढील वर्षी ‘नासा’चे युरोपा क्लीपर यान आगेकूच करेल. हे यान ऑक्टोबर 2024 मध्ये गुरू व चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे.

Back to top button