28 लाख खर्चून विवाह; ‘सावधान’ पती मात्र बेपत्ता!

विवाह
विवाह
Published on
Updated on

सिडनी : ऑस्ट्रेलियातील एका महिलेसोबत जे घडले, त्याचा कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही. झाले असे की, ज्या व्यक्तीच्या प्रेमात ती होती आणि ज्याच्यासमवेत तिने विवाह केला, तो तिचा प्रियकर पती मात्र विवाह झाल्यानंतर काही क्षणातच तेथून बेपत्ता झाला. वास्तविक, प्रेम, विवाह हे कोणासाठीही आयुष्यातील खास प्रसंग असतात. विवाहाबाबतीत तर सारेच जण खूप सीरिअस असतात; पण ऑस्ट्रेलियातील एका महिलेने जो अनुभव घेतला, तो निव्वळ दंग करून टाकणारा आहे.

'डेली स्टार'ने दिलेल्या वृत्तानुसार, इसाबेल ग्लास्टनबरी ही महिला एका अमेरिकन मुलाच्या प्रेमात होती. या उभयतांची भेट 2015 मध्ये झाली व नंतर ते एकत्रितही राहत होते. उभयतांचा नंतर लवकरच वाङ्निश्चय झाला आणि ते ऑस्ट्रेलियात आले. 31 वर्षीय इसाबेल प्रेमात जणू गढून गेली होती. तिने स्वत:चे 28 लाख खर्च करत शानदार विवाह सोहळ्याचे आयोजन केले. विवाह थाटात पार पडला; पण त्यानंतर यात ट्विस्ट आला.

इसाबेलच्या पतीचा व्हिसा मंजूर झाला, त्यादिवशी ते दोघे डिनरला एकत्रित गेले; पण ज्यावेळी ती परतली, त्यावेळी घराची रूपरेषाच बदलून गेली होती. तिचा पती 90 टक्के सामानासह गायब झाला होता. त्याने इमिग्रेशन अकाऊंटपासून सर्वत्र तिला ब्लॉक करून टाकले आणि तिच्यासाठी मात्र सार्‍या स्वप्नांचा अक्षरश: चक्काचूर झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news