अशीही नोकरी… फ्री पिझ्झा, चीज आणि गलेलठ्ठ पगार! | पुढारी

अशीही नोकरी... फ्री पिझ्झा, चीज आणि गलेलठ्ठ पगार!

मेडिसन : आजकाल जवळपास प्रत्येकाला आपल्या पसंतीची नोकरी हवी असते. खवय्यांची अपेक्षा अशी असते की, अशा ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी, जेथे स्वादिष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल असेल आणि एकापेक्षा एक खाद्यपदार्थ खाण्याची संधीही मिळेल; पण, प्रत्येकाची ही इच्छा फळतेच असे नाही. पगार चांगला मिळत असेल तर नोकरी चांगली नसते, नोकरी चांगली असेल तर पगार चांगला नसतो. दोन्ही उत्तम असेल तर ऑफिसचे वातावरण उत्तम असत नाही. अशा अनेक प्रकारच्या अडचणी असतात; पण जर आपण पिझ्झा, चीज, डेअरी प्रॉडक्टचे शौकिन असाल तर अशा लोकांसाठी एक खास नोकरी आहे, ज्यात दिवसभर पिझ्झा, चीज व डेअरी उत्पादने खायची आहेत आणि यासाठी पगारही गलेलठ्ठ आहे!

विस्कॉन्सिन मेडिसन सेंटर फॉर डेअरी रिसर्च विद्यालयाने यासाठी अनोखी जाहिरात काढली आहे. जॉब प्रोफाईलनुसार, स्वाद जाणण्यात माहिर असणारे उमेदवार यात अर्ज करू शकतात. पॅनेलमध्ये संधी मिळाल्यानंतर दर आठवड्याला त्यांना 12 पिझ्झा व 24 पनीरचे पदार्थ खाण्याची संधी मिळेल आणि त्यात त्यांना स्वाद, दर्जा, सुगंध आदीबाबत आपले निरीक्षण नोंदवायचे असते.

याशिवाय, निवडलेल्या उमेदवारांना पॅनेल डिस्कशन, ट्रेनिंग सेशन व अन्य संलग्न कार्यक्रमांत सहभागी व्हावे लागेल. विश्वविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, एक सत्र तीन तासांचे असू शकेल आणि प्रत्येक सत्रासाठी 45 डॉलरचे मानधन दिले जाणार आहे.

Back to top button