डोळे व आवाजानेही नियंत्रित होणारा रिअ‍ॅलिटी हेडसेट | पुढारी

डोळे व आवाजानेही नियंत्रित होणारा रिअ‍ॅलिटी हेडसेट

लंडन : अनेक कंपन्या अद्ययावत अशी उपकरणे बनवत आहेत. आता ‘अ‍ॅपल डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2023’ मध्ये कंपनीने आपला पहिला मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट लाँच केला आहे. याला ‘अ‍ॅपल व्हिजन प्रो’ असे नाव देण्यात आले आहे. हा हेडसेट डोक्यात घातल्यावर आणि डोळ्यांवर घातल्यावर वापरकर्त्यांसमोर एक स्क्रीन सादर करतो. ज्यामध्ये प्रत्येक लहान- मोठे काम केले जाते. मनोरंजन ते गेमिंगपर्यंत यामध्ये चांगला अनुभव मिळतो. ‘व्हिजन प्रो’ला डोळे हात आणि आवाजाने नियंत्रित केले जाऊ शकते असे कंपनीचे म्हणणे आहे.

याबाबतचे वृत्त ‘गॅजेटस् 360’ने दिले आहे. ‘अ‍ॅपल’ने जेव्हा ‘व्हिजन प्रो’ ची घोषणा ऐकली तेव्हा तिथे उपस्थित असणार्‍या माध्यमांना कंपनीने आश्चर्यचकीत केले. यामधले ‘आयसाईट’ हे एक असे फिचर आहे जे कोणी हे व्हिजन प्रो डोळ्यांवर हेडसेट घालते, तेव्हा ज्याने कोणी हे घातले आहे त्याच्यासह खोलीमध्ये कोणी आहे का हे शोधण्यासाठी डिव्हाईसच्या चारही बाजूंनी कॅमेरा सेन्सरचा वापर करते.‘व्हिजन प्रो’ मध्ये अनेक फिचर्स आहेत.

द़ृश्य स्पष्टपणे दिसण्यासाठी मायक्रो ‘ओएलईडी’ डिस्प्ले , पॉवरसाठी एम 2 चिप आणि हाताचे इशारे आणि नियंत्रणासाठी आवाजासह काम करेल असे अनेक कॅमेरे, सेन्सर आणि मायक्रोफोन यामध्ये मिळतात. वापरकर्ते व्हिजन प्रो मध्ये काही कामासाठी कीबोर्ड आणि माऊसचा देखील वापर करू शकता. व्हिजन प्रो बायोमेट्रिकसाठी तुमच्या डोळ्यांमधील रेटिना स्कॅन करण्यासाठी ऑप्टिक आयडीचा वापर करते आणि तुम्हाला हेडसेटमध्ये लॉग इन करता येते. हे सर्व ‘व्हिजनओएस’सह काम करते.

Back to top button